Next
नवव्या पुणे लघुपट महोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात
BOI
Monday, June 03, 2019 | 03:53 PM
15 0 0
Share this article:

पुणे : नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘आम्ही पुणेकर’ आणि मराठी चित्रपट परिवार या संस्थांतर्फे सात ते नऊ जून या कालावधीत नवव्या पुणे लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध देशातील शंभरहून अधिक लघुपट दाखविण्यात येणार आहेत.

‘लॉ कॉलेज रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सात जून रोजी सकाळी ११ वाजता ऑस्कर पुरस्कारांचे परिक्षक उज्ज्वल निरगुडकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महोत्सवामध्ये तीन दिवस सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत शंभरहन अधिक लघुपट दाखविण्यात येणार आहेत,’अशी माहिती संयोजक हेमंत जाधव आणि समीर देसाई यांनी दिली.

‘महोत्सवाचे पारितोषिक वितरण नऊ जून रोजी दुपारी चार  वाजता होणार आहे. जम्मु-काश्मिरमधील डोडा जिल्हृयाचे जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे संचालक विकास पाटील, निर्माते वैभव जोशी, निर्माते अनिल काकडे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. चित्रपट, दिग्दर्शक यासह तांत्रिक विभागातील मिळून विविध १२ विभागांमध्ये पारितोषिके देण्यात येणार आहेत,’ असेही त्यांनी सांगितले. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search