Next
मुंबई ते न्यूयॉर्क हवाईसेवा होणार नॉनस्टॉप
‘डेल्टा एअर लाइन्स’च्या सेवेला डिसेंबर २०१९ पासून प्रारंभ
प्रेस रिलीज
Friday, May 03, 2019 | 12:39 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : डेल्टा एअर लाइन्सची मुंबई ते न्यूयॉर्क जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी नॉनस्टॉप हवाईसेवा २४ डिसेंबर २०१९ पासून सुरू होत आहे. या सेवेमुळे जागतिक व्यापार क्षेत्रातील दोन दिग्ग्ज देशांच्या आर्थिक राजधान्या एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत, भारत व युनायटेड युनायटेड स्टेटस् दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आता अधिक जास्त निवड पर्याय उपलब्ध झाले आहेत.

या विषयी बोलताना ‘डेल्टा’चे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर एड बॅस्टिअन म्हणाले, ‘न्यूयॉर्क आणि मुंबईदरम्यान ‘डेल्टा’ची नॉनस्टॉप हवाईसेवा हे आमच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील विकासाचे सर्वांत नवीन उदाहरण आहे. इतर कोणत्याही एअरलाइनपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने संपूर्ण जगाला जोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’  

न्यूयॉर्कच्या जेएफके आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणाऱ्या या हवाईसेवेमुळे तिथून पुढे ५० पेक्षा जास्त शहरांपर्यंत पोहोचण्याचा विनासायास मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. यामध्ये उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका व कॅरिबिअन या भागांचा समावेश आहे. गेल्या दशकाच्या तुलनेत आता यूएस व भारत यांच्यादरम्यान हवाईसेवांची मागणी ६० टक्क्यांनी वाढली आहे. भरपूर कॉर्पोरेट ग्राहक असल्यामुळे न्यूयॉर्क हे शहर भारतासाठी सर्वांत मोठी यूएस बाजारपेठ बनले आहे.

‘डेल्टा’चे व्हाइस प्रेसिडेंट ट्रान्सआटलांटिक रॉबेर्टो इओरेट्टी म्हणाले, ‘आमची नॉनस्टॉप सेवा हा प्रवाशांसाठी मुंबई व न्यूयॉर्क दरम्यान प्रवासासाठी सर्वांत वेगवान पर्याय ठरेल.  जेएफके हबपासून पुढे विविध देश व शहरांपर्यंत अनेक हवाईसेवा उपलब्ध असल्याने व्यापार-उद्योग, तसेच सुट्टीसाठी म्हणून अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी ‘डेल्टा’ने अतिशय सहजसोपा, वेगवान पर्याय खुला करून दिला आहे.’     

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर राजीव जैन म्हणाले, ‘मुंबई आणि न्यूयॉर्कदरम्यान विमानसेवेमुळे या दोन देशांदरम्यान प्रवासाचे पर्याय वाढतील. यूएस व भारतादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही खूप मोठी सुविधा आहे.’

मुंबई आणि न्यूयॉर्क-जेएफके दरम्यान नवीन विमानसेवा ही ‘डेल्टा’ची दुसरी सर्वांत मोठी विमानसेवा असेल व यासाठी ‘डेल्टा’ आपले हल्लीच नूतनीकरण केलेले बोइंग ७७७-२०० एलआर विमान वापरणार आहे. या विमानामध्ये डेल्टा वन सूटची अनेक वैशिष्ट्ये अनुभवायला मिळणार आहेत. ऑल-सूट बिझनेस क्लास केबिन, तसेच डेल्टा प्रीमियम सिलेक्ट प्रदान करणारे प्रीमियम इकॉनॉमी, डेल्टा कम्फर्ट व मेन केबिन पर्यायांचा यामध्ये समावेश आहे.

ग्राहकांना ऑनबोर्ड अनेक सेवांचा आनंद घेता येणार आहे, यामध्ये ऑनबोर्ड वाय-फायमुळे व्हाट्सअपमार्फत मोफत मोबाइल मेसेजिंग, आयमेसेज (iMessage), फेसबुक मेसेंजर यांचा समावेश असेल. प्रवाशांच्या विनंतीनुसार ‘डेल्टा’तर्फे इन-फ्लाइट मनोरंजन सुविधादेखील दिली जाते. यात बॉलिवूड, तसेच जगभरातील चित्रपट सीटबॅक स्क्रीन्सवर पाहता येतात किंवा मोबाइल-टॅबलेट डिव्हाइसवर डाउनलोड करता येतात. प्रीमियम केबीन्समध्ये अॅमेनिटी किट्स दिले जातात. मेन केबिन ग्राहकांना अधिक जास्त आराम मिळावा यासाठी उशा व ब्लँकेट्स पुरविली जातात. त्याचबरोबरीने स्थानिक खाद्यपदार्थ दिले जातात.

डेल्टा वन केबिनमध्ये प्रवासादरम्यान खाजगी जागेचा अनुभव घेता येतो, स्लायडिंग डोअर, खाजगी स्टोवेज एरिया व पूर्णपणे आडवा केला जाऊ शकेल असा बिछाना या सुविधा यात पुरविल्या जातात. फ्लाइटच्या आधी मुख्य खाणे निवडण्याचा पर्यायदेखील दिला जातो. सध्या ग्राहक न्यूयॉर्क व ‘डेल्टा’च्या इतर यूएस नेटवर्कसाठी मुंबईहून ऍमस्टरडॅम, लंडन हीथ्रो व पॅरिस चार्ल्स दी गॉल या ‘डेल्टा’च्या युरोपियन हबमार्गे एअर फ्रान्स, केएलएम व व्हर्जिन अटलांटिक यांच्यासोबत ‘डेल्टा’च्या भागीदारीमार्फत प्रवास करत आहेत.

गेल्या दहा वर्षांत ‘डेल्टा’ने न्यूयॉर्क शहरात आपला कारभार ६५ टक्क्यांपेक्षा जास्त पटींनी वाढविला आहे. आज ही कंपनी लागार्डिया विमानतळ व जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ५००पेक्षा जास्त दिवसांच्या व्यस्त वेळांच्या हवाईसेवा चालवते. यामध्ये ‘जेएफके’वरून दररोज २००पेक्षा जास्त हवाईसेवा आहेत. ‘डेल्टा’ आपल्या भागीदारांच्या सहकार्याने ३२ देशांमधील ४३ आतंरराष्ट्रीय ठिकाणांपर्यंत सेवा देत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search