Next
‘एमडीएई’तर्फे डेटा अॅनालिटीक्स स्पेशलायजेशन कोर्स
प्रेस रिलीज
Saturday, March 30, 2019 | 04:40 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षणात अग्रेसर असलेल्या मेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकोनॉमिक्सतर्फे  (एमडीएई) डेटा अॅनालिटीक्स स्पेशलायजेशन अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये तीन मोड्यूल्स प्रविष्ट असून, यात मशीन लर्निंग, टाइम सीरीज आणि अॅडव्हान्स इकनॉमेट्रीक्स समाविष्ट आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना डेटा अॅनालिटीक्स कौशल्यांची माहिती दिली जाते.

सध्या उद्योगक्षेत्रात या सेगमेंटला मागणी आहे. हा अभ्यासक्रम अभिनव पद्धतीचा असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राच्या अंगाने डेटा अनालिटीक्स समजवून दिले जाते. त्यांना तर्क-आधार समजावून ते अर्थशास्त्र ज्ञान आणि दूरदृष्टीवर आजमावून जगासमोरच्या वास्तविक आव्हानांवर त्यांची अंमलबजावणी करण्याचे तंत्र शिकवले जाते. विद्यार्थ्यांनी हे स्पेशलायजेशन केल्यास नोकरीच्या संधींमध्ये महत्त्वपूर्ण वाढ होते. उलट ज्या विद्यार्थ्यांनी डेटा अॅनालिटीक्स स्पेशलायजेशनचा पर्याय निवडला आहे, त्यांना डेसीमल पॉइंट अॅनालिटीक्स, फ्रॅक्चल अॅनालिटीक्स, एमयु-सिग्मा, आणि आय-थिंक अशा ठिकाणी संधी उपलब्ध झाल्या आहेत.  

‘एमडीएई’चे सीओओ करण शहा म्हणाले, ‘आज विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांना बऱ्याचदा वाटते की, त्यांना अर्थशास्त्र आणि डेटाविषयात गती आहे; परंतु या क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळेच ‘एमडीएई’ने डेटा अॅनालिटीक्समधील स्पेशलायजेशनमध्ये पाऊल ठेवण्याचे निश्चित केले. सविस्तर, परिपूर्ण आणि समर्पक असा अभ्यास तीन मोड्यूलमध्ये समाविष्ट करून देण्यात आला आहे. आमचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना कौशल्य-सक्षम करण्याचे आहे. ‘एमडीएई’मध्ये अर्थशास्त्राच्या नजरेतून डेटा अॅनालिटीक्स शिकवले जाते, त्यामुळे विद्यार्थी केवळ कौशल्यसंपन्न न बनता सर्वोच्च पातळीवर समृद्ध बनतात.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search