Next
एडवर्ड अॅल्बी, अच्युत नारायण देशपांडे
BOI
Monday, March 12, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ?’ या पहिल्याच विक्रमी नाटकापाठोपाठ लागोपाठ तीन नाटकांसाठी पुलित्झर पारितोषिकं मिळवणारा अमेरिकेचा प्रसिद्ध नाटककार एडवर्ड अॅल्बी आणि जुनेजाणते समीक्षक अच्युत नारायण देशपांडे यांचा १२ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
...........
एडवर्ड अॅल्बी 

१२ मार्च १९२८ रोजी व्हर्जिनियामध्ये जन्मलेला एडवर्ड अॅल्बी हा अमेरिकेचा गाजलेला नाटककार! 

‘दी झू स्टोरी’ या एकांकिकेने आपली दाखल घ्यायला लावणाऱ्या अॅल्बीने नंतर लिहिलेल्या पहिल्याच पूर्ण लांबीच्या ‘हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ?’ या नाटकाने त्याला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. एका मध्यमवयीन जोडप्याच्या गुंतागुंतीच्या आयुष्यात घडणारी ही कथा. जॉर्ज आणि मार्था तिच्या वडिलांच्या घरच्या पार्टीहून रात्री उशिरा आपल्या घरी परतलेत. मार्था कॉलेजच्या अध्यक्षांची मुलगी आहे आणि त्याच कॉलेजमध्ये जॉर्ज इतिहासाचा प्रोफेसर आहे. रात्री उशिरा म्हणजे जवळजवळ दोन वाजता त्यांच्या घरी आणखी एक जोडपं येतं. गणिताचा प्रोफेसर निक आणि त्याची पत्नी हनी. आणि त्यांच्या गप्पांमधून सुरू होतं एक मानसिक द्वंद्व... एक मानसिक खेळ, जो उत्तरोत्तर अधिकच प्रक्षोभक आणि हिंसक होत जातो. त्यांच्या त्या मानसिक संघर्षातून सर्वांच्याच आयुष्यातली गुपितं बाहेर येतात आणि पुढे??.. खूपच इंटरेस्टिंग नाटक होतं हे! या नाटकाला प्रतिष्ठेचा ‘टोनी अॅवॉर्ड’ मिळाला होता आणि या नाटकावर हॉलिवूडमध्ये फिल्मही बनली होती, ज्यात एलिझाबेथ टेलर आणि रिचर्ड बर्टनने भूमिका केल्या होत्या. 

अॅल्बीला पुढच्या ‘ए डेलिकेट बॅलन्स’बद्दल पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. त्यावरसुद्धा हॉलिवूडमध्ये फिल्म बनली होती, ज्यात कॅथरीन हेपबर्न आणि पॉल स्कॉफिल्डने कामं केली होती. कौटुंबिक नातेसंबंधामधले ताणतणाव त्यात प्रत्ययकारकपणे दाखवले होते. कमाल म्हणजे अॅल्बीच्या त्यापुढच्या ‘सीस्केप’ आणि ‘दी थ्री टॉल विमेन’ या दोन्ही नाटकांनाही पुलित्झर पुरस्कार मिळाले होते. 

मानवी मनातली घालमेल, परस्पर संबंध, गुंतागुंत, आयुष्यात काहीतरी गमावल्याची खंत असं सर्व मांडण्यात अॅल्बीचा हातखंडा होता, असं म्हणता येईल. त्याने जवळजवळ दोन डझन नाटकं लिहिली. 

१६ सप्टेंबर २०१६ रोजी अॅल्बीचा न्यूयॉर्कमध्ये मृत्यू झाला.
............

अच्युत नारायण देशपांडे
१२ मार्च १९१५ रोजी जन्मलेले अच्युत नारायण देशपांडे हे समीक्षक म्हणून ओळखले जातात. 

आधुनिक वाङ्मयाचा इतिहास भाग १ व २, प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड १ ते ७, प्रमेयांची उद्याने, प्लेटोचे साहित्यशास्त्र, मराठी संत-काव्य आणि कर्मयोग – असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१४ ऑक्टोबर १९९० रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link