Next
किशोर लोंढेचा लघुपट आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये प्रथम
पत्रकारितेवर आधारित एका मिनिटाचा लघुपट
BOI
Friday, February 01, 2019 | 11:46 AM
15 0 0
Share this story

किशोर लोंढेपुणे : येथील किशोर लोंढे या तरुणाने दिग्दर्शित केलेल्या आजच्या पत्रकारितेवर आधारित ‘दी कॅप्टिव्हिटी’ या लघुपटाला प्रिश्टिना कोसोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लाईफ सेफ्टी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये बेस्ट शॉर्टफिल्म विभागात प्रथम पारितोषिक मिळाले आहे. 

या महोत्सवात ९२ देशातून ९०० लघुपटांनी सहभाग घेतला होता, त्यातील ७२० लघुपटांमधून उत्कृष्ट सहा लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यात ‘दी कॅप्टिव्हिटी’ या एकमेव लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला. या एका मिनिटाच्या लघुपटामध्ये, लोकशाहीचा एक मजबूत आणि प्रभावी आधारस्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेची अलीकडच्या काळातील अवस्था; तसेच राजकारणी किंवा गुन्हेगार लोकांनी ताकदीच्या जोरावर हिरावून घेतलेले पत्रकारितेचे स्वातंत्र्य प्रखरतेने दाखवण्यात आले आहे. या लघुपटातून किशोरने अप्रत्यक्षरित्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर मार्मिक भाष्य केले आहे. 

आतापर्यंत युरोप, अमेरिका, इटली, रशिया, आफ्रिका या ठिकाणच्या अनेक आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये हा लघुपट दाखण्यात आला असून, बऱ्याच ठिकाणी या लघुपटाने अंतिम फेरी गाठली आहे. ‘दी कॅप्टिव्हिटी’ या लघुपटाचे चित्रीकरण प्रीतेश गावंडे यांनी केले असून, निर्मिती अविनाश लोंढे यांनी केली आहे. 

मुळचा सातारा जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वेणेगाव इथला असलेला किशोर लोंढे एमबीए पदवीधर असून, आपली चित्रपट निर्मितीची आवड जोपासण्याचा निर्णय घेत त्याने दिग्दर्शनात यश मिळविले आहे. ग्रामीण पार्श्वणभूमी असल्यामुळे सामाजिक लघुपट बनवून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न किशोर आणि त्याचे सहकारी करत आहेत. या अगोदर किशोरचा ‘आझादी’ हा लघुपटही गाजला होता. किशोरने आझादी, जन्मजात अशा यशस्वी लघुपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. ‘दी कॅप्टिव्हिटी’ हा त्याचा तिसरा लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरला आहे.

‘प्रिश्टिना कोसोवा भरलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आणि माझ्या लघुपटाला पहिले बक्षीसही मिळाले ही खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे,’ अशी भावना किशोर लोंढे याने व्यक्त केली
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link