Next
‘सूर्यदत्ता’तर्फे आयोजित ‘जॉबफेअर’ला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, March 26, 2019 | 01:00 PM
15 0 0
Share this article:

सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व ईक्लॅट हॉस्पिटॅलिटी यांच्या वतीने आयोजित जॉबफेअरचे उद्घाटन करताना बावधनच्या सरपंच पियुषा दगडे, बबन दगडे पाटील, डॉ. शेफाली जोशी आदी.

पुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि ईक्लाट हॉस्पिटॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत जॉबफेअरचे आयोजन करण्यात आले होते. कार्निव्हल जगातील सर्वांत मोठ्या क्रूजसह अन्य क्रुज कंपन्या आणि देशविदेशातील पंचतारांकित हॉटेल्स या जॉबफेअरमध्ये सहभागी झाले होते.

बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल-टुरिझममध्ये हॉटेल मॅनेजमेंट संबंधित सर्वांसाठी आयोजिलेल्या या मेळाव्यात ७०० पेक्षा अधिक तरुणांनी मुलाखती दिल्या. या मेळाव्याचे उद्घाटन बावधनच्या सरपंच पियुषा दगडे पाटील, बबन दगडे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व ईक्लॅट हॉस्पिटालिटीच्या दीपाली पात्रीकर ‘सूर्यदत्ता’च्या संचालिका (जनसंपर्क) कॅप्टन शालिनी नायर, चेतन मुनगंटीवार, नुतन गवळी, ‘ईक्लॅट’च्या अनुराधा खोत आदी उपस्थित होते. या मेळाव्यात पुणे-मुंबईसह रत्नागिरी, नुंदुरबार, नाशिक आदी जिल्ह्यांतून विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के अभ्यासक्रम पूर्ण केलेले (फ्रेशर्स) होते.

जॉबफेअरमध्ये सहभागी झालेल्या कार्निव्हल क्रूज, ली मेरिडियन, जेडब्ल्यू मेरियट आदी कंपन्यांचे प्रतिनिधी.

रोजगाराभिमुख कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप जागतिक दर्जाचे केंद्र बनले आहे. आज संस्थेतील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या कंपन्यांवर उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम करीत आहेत. त्यामध्ये कार्निव्हल क्रूझलाइन, हिल्टन साल्सा रिसॉर्ट ओमान, डॅनबुल्स हॉटेल लंडन, अल खलीज पॅलेस दुबई, ओबेरॉय त्रिडंट मुंबई यांसारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यात प्लेसमेंट्स मिळालेल्या आहेत. यापुढचे पाऊल म्हणजे, ईक्लॅट हॉस्पिटॅलिटीच्या सहकार्याने ‘ग्लोबल सीएसआर इनिशिएटिव्ह फॉर इंटर्नशिप अँड प्लेसमेंट’ उपक्रमांतर्गत सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी व काम करत असलेले तरुण यांच्यासाठी मेगा जॉबफेअरचे आयोजन केले गेले.

यामध्ये पीअँडओ क्रुजेस, कोस्टा, हॉलंड अमेरिका लाइन, कुनार्ड, सीबर्न, प्रिन्सेस क्रुजेस आदी क्रूज कंपन्या, त्याचबरोबर रिट्झ कार्लटन, ताज विवांता, ल मेरिडियन, नोवाटेल, डबल ट्री बाय हिल्टन, हयात रिजेन्सी, ओकवुड रेसिडन्स, आयबीस, कॉनरॅड, दी प्राइड, हॉलिडे इन यांचा समावेश होता. पहिल्यांदाच कार्निव्हल क्रूज कंपनीने आपल्या क्रूजवर फ्रेशर्सना संधी दिली आहे.

विविध कंपन्यांच्या स्टॉलवर मुलाखती देताना विद्यार्थी व कर्मचारी.

या विषयी बोलताना प्रा. डॉ. चोरडिया म्हणाले, ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांबरोबरच इतर महाविद्यालयांतील तरुणांनाही संधी मिळावी, या सामाजिक भावनेतून हॉटेल मॅनेजमेंटशी संबंधित सर्वांसाठी हा नोकरी मेळावा होता. राज्यभरातून विद्यार्थ्यांनी याला प्रतिसाद दिला, याचा आनंद आहे. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदविका, पदवी आणि पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले व सध्या काम करत असलेल्या तरुणांनी मुलाखती दिल्या. त्यांना त्याचा लाभ होईल, हा विश्वास आहे. या कार्यक्रमाचे नियोजन सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केले.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search