Next
देआसरा फाउंडेशनतर्फे छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन
प्रेस रिलीज
Tuesday, October 30, 2018 | 03:37 PM
15 0 0
Share this article:पुणे : ना नफा तत्वावर काम करणाऱ्या देआसरा फाउंडेशनतर्फे सेनापती बापट रस्त्यावरील देवांग मेहता ऑडिटोरियम येथे उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याच्या माध्यमातून ‘देआसरा’ने उद्योजकांचा यशस्वी प्रवास व त्यांचे अनुभव लोकांसमोर मांडले. 

या सोहळ्यात शालगर होजिअरीचे मिलिंद शालगर, लागू बंधू ज्वेलर्सच्या संचालिका नेहा लागू, पॅपिलॉन हेअर व फेस क्लिनिकचे संस्थापक व संचालक, डॉ. विनय कोपरकर, देसाईबंधू आंबेवालेचे मंदार देसाई, बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक व संचालक हनमंत गायकवाड या यशस्वी उद्योजकांना पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेडचे संस्थापक व संचालक आणि देआसरा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

डॉ. देशपांडे म्हणाले, “देआसरा शहरातील रोजगार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे. त्यासाठी लागणाऱ्या व्यावसायिक सूची, माहिती आमच्या वेबसाइटवर आहेतच, शिवाय आमच्या टीमशी फोनवर संवाद साधूनही अधिक माहिती मिळू शकते. उद्योजकांना सर्व व्यावसायिक माहिती व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे यासाठी देआसरा कार्यरत आहे. देआसराने आजपर्यंत फूड, फॅशन, ब्युटी या व अशा अनेक क्षेत्रातील आठ हजारांहून अधिक व्यावसायिकांना मार्गदर्शन केले आहे.’

उद्योजकांना प्रोत्साहन देताना गायकवाड म्हणाले, ‘स्वतःचा व्यवसाय सुरू करत असताना देशाच्या प्रगतीसाठीही काहीतरी करावे अशी इच्छा होती. प्रत्येक उद्योजक आपल्या ध्येयासाठी सातत्याने काम करत राहिला, तर यशस्वी उद्योगाचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.’शालगर म्हणाले, ‘उत्पादनातील वेगळेपण तुमच्या व्यवसायासाठी नक्कीच फायदेशीर ठरते. शालगर होजिअरी गेले अनेक वर्षे वेगवेगळ्या पारंपरिक कपड्यांद्वारे उत्पादनात वेगळेपण आणत आले आहेत आणि आज संपूर्ण कुटुंबासाठी कपडे मिळण्याचे ठिकाण म्हणून नावाजले आहेत.’

साचेबद्ध काम न करता खास पुरुषांसाठी हेअर ड्रेसिंग सलून व स्किन ट्रीटमेंट सेंटर काढणारे विनय कोपरकर हे पहिलेच डॉक्टर होते. अर्थातच नकारात्मक प्रतिक्रिया आणि टीका, पण त्याला दाद न देता या विषयाबद्दल त्यांनी अधिकाधिक अभ्यास करून शिक्षण घेतले व केस कापणे म्हणजे नुसती हजामत नाही, तर ते एक शास्त्र आहे अशी विचारसरणी त्यांनी आणली.

‘गेले ८७ वर्षे देसाईबंधू आंबेवाले ग्राहकांचा विश्वास जपत आले आहेत आणि तीच उद्योजक म्हणून यशाची एक गुरुकिल्ली आहे,’ असे देसाई यांनी सांगितले.

‘आजच्या ग्राहकवर्गाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्रत्येक दागिना तयार करणे यावर लागू बंधू ज्वेलर्सचा भर असतो,’ असे नेहा लागू यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search