Next
अमर शेख, आर्ट बखवाल्ड
BOI
Friday, October 20 | 04:00 AM
15 0 0
Share this story

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या दमदार पहाडी आवाजानं अवघा महाराष्ट्र चेतवणारे शाहीर अमर शेख आणि खुसखुशीत स्तंभलेखनानं जगप्रसिद्ध झालेला आर्ट बखवाल्ड यांचा २० ऑक्टोबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
........
अमर शेख 

२० ऑक्टोबर १९१६ रोजी बार्शीमध्ये जन्मलेले अमर शेख हे शाहीर अमर शेख म्हणूनच महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्यांच्या दु:खाचं वर्णन करणारी शाहिरी त्यांनी लिहिली. 

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी अतुलनीय कामगिरी केली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पहाडी आवाजातील जोशपूर्ण पोवाड्यांनी त्यांनी अवघा महाराष्ट्र जागृत केला होता. आचार्य अत्रे यांनी त्यांचं वर्णन ‘अमर शेख म्हणजे धग, रग, आग, धुंदी आणि बेहोषी यांची जिवंत बेरीज’ असं केलं होतं. 

त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही भाग घेतला होता. त्यांचा ओढा साम्यवादी पक्षांकडे होता. युगदीप मासिकाचं संपादन त्यांनी केलं होतं. 

प्रपंच आणि ज्योतिबा फुले या सिनेमांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. अमरगीत, कलश, धरतीमाता, पहिला बळी असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

२९ ऑक्टोबर १९६९ रोजी त्यांचं निधन झालं. 
........

आर्ट बखवाल्ड 

२० ऑक्टोबर १९२५ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला आर्ट बखवाल्ड हा विनोदी लेखनासाठी आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’मधल्या त्याच्या खुसखुशीत स्तंभलेखनासाठी जगप्रसिद्ध आहे. त्याचं ते स्तंभलेखन जगातल्या बहुतेक देशांमधल्या महत्त्वाच्या वृत्तपत्रांमधून पुनर्प्रकाशित होत असे. 

‘न्यूयॉर्क हेराल्ड ट्रिब्युन’साठी त्यानं पॅरिसहून लिहिलेल्या ‘युरोप्स लायटर साइड’या स्तंभामुळे त्याला लोकप्रियता लाभत गेली. त्याच्या लेखनकौशल्यासाठी त्याला पुलित्झर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 

आर्ट बखवाल्ड्स पॅरिस, दी ब्रेव्ह काउवर्ड, ए गिफ्ट फ्रॉम दी बॉइज, डोंट फर्गेट टू राइट, आय चोझ कॅपिटल पनिशमेंट, ओह टू बी ए स्विंगर, आय नेव्हर डान्स्ड अॅट दी व्हाइट हाउस, वॉशिंग्टन इज लिकिंग अशी त्याची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

१७ जानेवारी २००७ रोजी त्याचा वॉशिंग्टनमध्ये मृत्यू झाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link