Next
दी इकॉनॉमिक कॅन्सर
BOI
Wednesday, September 26, 2018 | 10:20 AM
15 0 0
Share this article:

आधुनिक व यांत्रिक युगात आपण निर्सगनियमाच्या विरुद्ध जीवनशैली जवळ करताना आरोग्य मात्र हिरावून बसतो. त्यानंतर स्वास्थप्राप्तीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची वेळ येते. हे टाळण्यासाठी काय केले पाहिजे, शरीराकडे होणारे दुर्लक्ष, नवीन रोगांचा प्रसार या सर्व गोष्टींबाबत डॉ. सारंग फडके यांनी ‘दी इकॉनॉमिक कॅन्सर’मधून मार्गदर्शन केले आहे.

आजच्या विज्ञानयुगातही मधुमेह, उच्च रक्तदाब, नैराश्य, कर्करोग आदी घातक आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे, असे सांगत डॉक्टरांनी कारणांचा विविधांगाने शोध घेतला आहे. भारतात समृद्धी आली, तरी माणूस निरोगी असणे हे जास्त गुंतागुंतीचे बनले. असे का झाले याचा मागोवा घेताना लेखाने स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचा भारताच्या अर्थ व राजकारणाचा खेळ कसा खेळला जातो हे स्पष्ट केले आहे. लोकशाही राज्यघटना विरुध्द आर्थिक सुधारणांचे चित्रण करताना १९९५ ते २०१४ पर्यंतच्या जगातील घडामोडींचा विचार करीत ‘हेल्थ व्हर्सेस वेल्थ’चे द्वंद्व, भारतातील आरोग्याचे चित्र यातून सविस्तरपणे व सामान्यांनाही समजेल अशा सोप्या भाषेत मांडले आहे.

प्रकाशक : अल्टिमेट असोसिएटस्
पाने : ४३५
किंमत : ४०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search