Next
‘आयजी इंटरनॅशनल’ला इम्पोर्टर ऑफ दी इयर पुरस्कार
प्रेस रिलीज
Monday, September 24, 2018 | 03:26 PM
15 0 0
Share this article:मुंबई : सर्वोत्तमतेवर सातत्याने लक्ष केंद्रित करणाऱ्या आणि भारतातील सर्वांत मोठ्या ताज्या फळांची आयातदार कंपनी असलेल्या ‘आयजी इंटरनॅशनल’ला हाँगकाँगमध्ये नुकत्याच आयोजित केलेल्या ‘२०१८ एशिया फ्रुट अॅवॉर्डस’मध्ये इम्पोर्टर ऑफ दी इयर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. ‘आयजी इंटरनॅशनल’चा गौरव भारतीय ग्राहकांना आयात केलेल्या फळांच्या श्रेणीच्या विस्तारासाठीही करण्यात आला आहे.

‘आयजी इंटरनॅशनल’ ही भारताच्या आघाडीच्या ताज्या फळांची आयातदार कंपनी असून, तिच्याकडून २० पेक्षा अधिक देशांमधील ५० पेक्षा अधिक प्रकारची फळे आयात केली जातात. या कंपनीने कोल्ड चेन साधनसुविधेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे आणि ताज्या फळांच्या आयातीला तिने चालना दिली आहे. त्यामुळे कंपनीला उत्तम दर्जाची फळे व चवी भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात मदत होते. यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर फळे पाठवण्यासाठी जागतिक पुरवठादारांमध्ये जास्त विश्वास जागृत झाला आहे.

हा पुरस्कार स्वीकारताना आयजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक तरुण अरोरा म्हणाले, ‘आयजीमधील माझ्या संपूर्ण टीमच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद आणि उत्साह वाटतो आहे. एशिया फ्रुट अॅवॉर्ड्सकडून मिळालेल्या या मान्यतेसाठी आम्हाला खूप कृतज्ञता वाटते. मागील अनेक दशकांपासून माझ्या संस्थेने प्रतिष्ठेच्या आयात कंपनीकडून अपेक्षित असलेला दर्जा प्राप्त करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचा हा पुरस्कार प्रतीक आहे.’

वार्षिक एशिया फ्रुट अॅवॉर्ड्सकडून आशियाच्या फळ आणि भाज्यांच्या व्यवसायात सर्वोत्तमता व उत्तम कामगिरीचा गौरव केला जातो आणि विविध वर्गवारीत हे पुरस्कार दिले जातात.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search