Next
‘उरी’नंतर पडद्यावर पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राइक’
‘२६ फेब्रुवारी’वर संजय लीला भन्साळी बनवणार चित्रपट
BOI
Monday, March 18, 2019 | 02:58 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘उरी’वरील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’वर आलेला चित्रपट ‘उरी’ मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरला. त्यानंतर आता १४ फेब्रुवारीला झालेल्या ‘पुलवामा’ हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी केलेल्या ‘एअर स्ट्राइक’वर चित्रपट येत आहे. निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हा चित्रपट घेऊन येत आहेत. 

‘उरी’च्या प्रचंड यशानंतर बॉलीवूडमध्ये जणू देशभक्तिपर चित्रपटांची लाटच आली. अजूनही काही चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. असे असताना १४ फेब्रुवारीला झालेल्या ‘पुलवामा’ हल्ल्याला भारतीय जवानांनी ‘एअर स्ट्राइक’ने दिलेल्या सडेतोड उत्तराची घटना ताजी असताना त्यावर चित्रपट येणार हे सर्वांनाच ठाऊक होते. निर्माते संजय लीला भन्साळी यांनी आपण या ‘एअर स्ट्राइक’च्या घटनेवर आधारित चित्रपट बनवत असल्याचे स्पष्ट केले आहे. 

१४ फेब्रुवारीला झालेल्या ‘पुलवामा’ हल्ल्यानंतरच त्या घटनेवर आधारित चित्रपटांची नावे नोंदणी करण्यासाठी अनेकांची चढाओढ लागली होती. त्यात २६ फेब्रुवारीला भारतीय सेनेने केलेल्या ‘एअर स्ट्राइक’नंतर ही चढाओढ अधिक वाढली. २६ फेब्रुवारीला ‘बालाकोट’मधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संस्थेच्या तळावर हल्ला चढवत भारतीय जवानांनी २०० ते ३०० दहशतवाद्यांना मारले. भारतीय वायुसेनेच्या याच साहसाला सलाम करण्यासाठी हा चित्रपट बनवण्यात येत असल्याचे भन्साळी यांनी सांगितले आहे. 

दिग्दर्शक अभिषेक कपूर हा चित्रपट दिग्दर्शित करणार असून निर्मात्यांमध्ये संजय लीला भन्साळी यांच्यासोबत भूषण कूमार आणि महावीर जैन यांचाही समावेश आहे. चित्रपटावर काम सुरू करण्यात आले असून या वर्षीच्या मध्यापर्यंत चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले आहे. चित्रपटात कोणते कलाकार असतील, हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नसले, तरी भन्साळी, भूषण कुमार यांच्यासारखे बडे निर्माते चित्रपट घेऊन आहेत म्हटल्यावर कलाकारही त्या तोडीचेच असतील यात शंका नाही. 

या चित्रपटात विंग कमांडर ‘अभिनंदन वर्धमान’ याच्यावरदेखील भाष्य केले जाईल. पुलवामा हल्ला, भारतीय जवानांचा सर्जिकल स्ट्राइक आणि विंग कमांडर अभिनंदन यांवर आधारित हा चित्रपट असेल. आत्तापर्यंत या चित्रपटासाठी ‘बालाकोट’, ‘पुलवामा -  द डेडली अटॅक’, ‘सर्जिकल स्ट्राईक २.०’, ‘वॉर रूम’, ‘हिंदुस्थान हमारा है’, ‘हाऊ इज ज जोश’ यांसारख्या नावांची नोंदणी करण्यात आली आहे.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search