Next
सावरकर ‘माफीवीर’ नव्हेत, स्वातंत्र्यवीरच!
राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवांनी कीर्तनातून उलगडला खरा इतिहास
BOI
Saturday, January 05, 2019 | 03:48 PM
15 0 0
Share this article:

राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा

रत्नागिरी :
‘चुकीचे आणि अर्धवट संदर्भ घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘माफीवीर’ असे संबोधले जाते, हे दुर्दैव आहे. प्रत्यक्षात त्यांनी जे पत्र इंग्रजांना लिहिले होते, ते पत्र त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात जसेच्या तसे दिले आहे. ‘हिंदुस्थानाला संपूर्ण स्वातंत्र्य देत असाल, तर जागतिक महायुद्धात आम्ही इंग्लंडच्या बाजूने उभे राहायला तयार आहोत,’ असे त्यांनी लिहिले होते; मात्र या वाक्यातील पहिल्या अर्ध्या भागाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे सावरकर ‘माफीवीर’ नव्हेत, तर स्वातंत्र्यवीरच आहेत,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले. 

रत्नागिरीतील कीर्तनसंध्या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (चार जानेवारी २०१९) ते बोलत होते. ‘चार काटक्या गोळा करून घरटे उभारून वीण वाढवायची असा जर संसार असेल, तर तो सगळेच जण करतात; पण आपल्याला काही तरी महत्तम करायची संधी परमेश्वराने दिली आहे. देशातील घरांवर सोन्याची कौलारं यायला हवी असतील, तर आपल्या कौलांचा होम करण्याला पर्याय नाही,’ अशा शब्दांत सावरकरांनी अंदमानात भेटायला आलेल्या आपल्या पत्नीची समजूत काढली होती. त्या वेळी सावरकर २८ वर्षांचे होते, तर त्यांची पत्नी २२-२३ वर्षांची होती. त्या वयात त्यांचे विचार किती उदात्त होते, याची कल्पना यावरून येते,’ असे आफळेबुवा म्हणाले. 

‘अंदमानच्या कारागृहातील भिंतींवर सहा सहस्र ओळींचे काव्य रचणारा सावरकर हा एकमेव क्रांतिकारक आहे. ते जेव्हा रत्नागिरीत तुरुंगात होते आणि नंतर स्थानबद्ध होते, तेव्हा इथे राहून त्यांनी देशाच्या राजकारणाची चक्रे फिरवली होती. आज जेव्हा अंदमानचा इतिहास सांगताना लाइट-साउंड शो दाखवला जातो, तेव्हा गाइड ‘इथे महाराष्ट्राचा वाघ राहत होता’ असे सांगतो, तो अभिमानाचा क्षण असतो,’ असे आफळेबुवांनी सांगितले. ‘देशाच्या पंतप्रधानांनी सावरकरांच्या प्रतिमेसमोर बसून वंदन केल्याचा सुवर्णक्षण बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाला,’ असेही आफळेबुवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताज्या अंदमानभेटीचा संदर्भ देऊन सांगितले. 

प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांचा आफळेबुवांच्या हस्ते गौरवप्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांचा आफळेबुवांच्या हस्ते गौरव‘सावरकरांना ब्रिटिशांनी पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानात पाठवले. सावरकरांनी तिथे साक्षरता वर्ग सुरू केला. बळजबरीचे धर्मांतर रोखले. कैद्यांचे प्रबोधन केले. दिवाळीला कुटुंबाकडून मेवामिठाई मागवण्याऐवजी सर्व बंदिवानांना एक पुस्तक मागवण्यास सांगितले व वाचनालय उभे केले. सण-उत्सव सुरू केले. भारतीय बंदिवानांकडून ते अनेक भाषा शिकले. हे प्रचंड प्रेरक आहे,’ असे प्रतिपादन आफळेबुवांनी केले. अंदमानात शिक्षा भोगत असतानाही या भागात स्वतंत्र भारताच्या नौदलाचा तळ होऊ शकतो, असा विचार सावरकर करत होते, असेही त्यांनी सांगितले. 

सावरकरांनी बोटीतून मारलेल्या उडीचे यथार्थ चित्रण बुवांनी कीर्तनातून उभे केले. सावरकरांच्या जीवनातील अनेक हृदयद्रावक प्रसंग ऐकून उपस्थितांचे मन हेलावले.

क्रांतिब्रह्म व शांतिब्रह्म एकनाथ
पूर्वरंगात बुवांनी संत एकनाथांचा ‘काया ही पंढरी’ हा अभंग निरूपणासाठी घेतला होता. क्रांतिब्रह्म व शांतिब्रह्म असा नाथांचा उल्लेख करून त्यांनी त्यांचे कार्य विशद केले. ‘त्यांचे आई-वडील लवकरच गेले. त्यामुळे त्यांचा सांभाळ आजी-आजोबांनी केला. ते वयाच्या आठव्या वर्षी दौलताबादच्या किल्ल्यावर जनार्दन स्वामींकडे गेले. शस्त्रसामर्थ्य व आध्यात्मिक संप्रदायातून समृद्ध समाज उभा करायचा असतो, ही शिकवण जनार्दनस्वामींनी दिली. एकनाथांनी हे सर्व केले. एकदा गडाच्या दरवाजावर आक्रमण झाले तेव्हा नाथांच्या नेतृत्वाखाली लढाई झाली,’ असे बुवांनी सांगितले.

प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांचा आफळेबुवांच्या हस्ते गौरवप्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांचा आफळेबुवांच्या हस्ते गौरवमध्यंतरामध्ये आफळेबुवांनी विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड व स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. प्रश्नामंजूषा स्पर्धेत लीना चांदोरकर, तन्मय जोशी, स्वरूप जोशी या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. त्यांना बुवांच्या हस्ते पुस्तक भेट देण्यात आले.

निबंध कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित भट यांनी गायनाची साथ केली. हेरंब जोगळेकर, मधुसूदन लेले, उदय गोखले, वैभव फणसळकर, प्रथमेश तारळकर, हरेश केळकर, सुखदा मुळ्ये व अदिती चक्रदेव, श्रीरंग जोगळेकर यांनी बुवांना वाद्यसाथ केली.

(स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘यशोयुतां वंदे’ हे गीत आफळेबुवांनी वीररसपूर्ण स्वरूपात सादर केले. त्याची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत... पहिल्या दिवशीच्या कीर्तनाचे वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा. दुसऱ्या दिवशीचे वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा. २०१८च्या कीर्तनसंध्या उपक्रमातील कीर्तनांचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)सावरकरांची ई-बुक्स मोफत :
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anjali Lalit About 222 Days ago
अशी प्रबोधन करणारी कीर्तनं झाली पाहिजेत. पण हल्ली झिंगाटाला महत्व आलय. आफळेबुवाना मनःपूर्वक नमस्कार आणि पोस्टबद्दल धन्यवाद.
1
0
Jeetendra Mohan About 223 Days ago
Very Truly Said. The Congress has always Twisted the Truth for Only Gandhi Nehru Family
0
0

Select Language
Share Link
 
Search