Next
दीपिका रेड्डी यांच्या कुचीपुडी नृत्याने पुणेकर भारावले
प्रेस रिलीज
Monday, April 22, 2019 | 05:11 PM
15 0 0
Share this article:


पुणे : नृत्ययात्री संस्थेच्या संस्थापिका मेघना साबडे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कुचीपुडी नृत्यप्रकारातील  जागतिक स्तरावरील नृत्यांगना दीपिका रेड्डी यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने पुणेकर भारावून गेले. 

भोसलेनगर, रेंजहिल्स जवळील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात दीपिका यांनी काही पारंपरिक रचनांवर नृत्यप्रस्तुती केली. ‘विजय गणपती त्वं वंदे...’ या गणेशवंदनेने त्यांनी आपल्या नृत्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘रुद्रमाप्रवेशम’ ही डीएसव्ही शास्त्री यांनी संगीतबद्ध केलेली पारंपरिक कुचीपुडी रचना सादर केली.

दीपिका यांच्या मुली गायत्री आणि श्लोका यांनी श्रुंगार रागातील ‘चक्कनि तलिकी’ ही व्यंकटेश्वर अर्थात बालाजी देवाची पत्नी अलमेलुमंगा यांची स्तुती करणारी नृत्यरचना सादर करीत उपस्थितांची वाह वाह मिळविली. तर ‘नी माटले मायनुरा...’ या पूर्वी कल्याण रागातील जावळीने दीपिका यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ‘तरंगम्’ने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला.     

या वेळी मराठ्यांच्या इतिहासात मोलाची कामगिरी बजाविणाऱ्या रास्ते कुटुंबाविषयीच्या ‘क्रॉनिकल्स ऑफ रास्ते फॅमिली ऑफ मेहूणपुरा’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील पार पडले. रास्ते परिवारातील उमा शशी भालेराव, सुमती दामले, आशा खोत, आनंद भालेराव, प्रदीप खिरे, नितीन भणगे, नागेश भालेराव आणि शांतीलाल कटारिया या मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी दिनेश आणि पौर्णिमा रास्ते हेदेखील उपस्थित होते.

‘क्रॉनिकल्स ऑफ रास्ते फॅमिली ऑफ मेहूणपुरा’ हे पुस्तक अमेय फडणीस यांनी लिहिले असून, पुण्यातील मेहूणपुरा भागातील रास्ते कुटुंबियांचा इतिहास, त्यांच्या वंशावळीची माहिती यात दिलेली आहे. रास्ते कुटुंबीयांचे मराठ्यांच्या इतिहासात मोलाचे योगदान आहे. कोकणामधील एक सामान्य शेतकरी कुटुंब असलेले रास्ते कुटुंब मराठा व ब्रिटिशकालीन इतिहासात एक महत्त्वाचे सामंती कुटुंब म्हणून नावारूपास आले, त्याचा प्रवास या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आला आहे. दिनेश रास्ते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भरतनाट्यम् कलाकार परिमल फडके यांनी सूत्रसंचलन केले.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search