Next
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ‘२.०’चा श्रीगणेशा...
भारतातील सर्वांत मोठ्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
BOI
Friday, September 14 | 02:05 PM
15 0 0
Share this story


बहूचर्चित आणि बहूप्रतिक्षित अशा ‘२.०’ चित्रपटाचा टीझर अखेर गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला आहे. तांत्रिक कारणांनी गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वारंवार पूढे ढकलण्यात येत होती. त्यात या टीझरच्या प्रदर्शनाने चाहत्यांची नाराजी काही प्रमाणात कमी होईल, असा विश्वास चित्रपटाच्या निर्मात्यांना वाटत आहे. 

रजनीकांत, अक्षय कुमार आणि अॅमी जॅक्सन या तगड्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘२.०’ हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या चित्रपटातील स्पेशल इफेक्टसाठी तब्बल ५४४ कोटींचा खर्च केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर यात केला जाणार आहे. केवळ ‘व्हीएफएक्स’साठी इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करणारा हा भारतातील पहिला चित्रपट ठरणार आहे. जगभरातील तब्बल तीन हजार तंत्रज्ञांची टीम या चित्रपटासाठी सध्या काम करत असल्याचे सांगितले जात आहे. 

अभिनेता अक्षय कुमारने आपल्या वैयक्तिक ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरून गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आपण चित्रपटाचा ऑफिशिअल टीझर प्रकाशित करत असल्याचे सांगितले आहे. ‘गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही भारतातील सर्वांत मोठ्या चित्रपटाचा श्रीगणेशा करत आहोत. सर्वांत मोठ्या शत्रुत्वाची कहानी.. चांगले काय, वाईट काय, कोण ठरवणार...??’, अशा शब्दांत अक्षयने ट्विट केले आहे आणि या टीझरमध्ये नेमके काय पाहायला मिळेल याची हिंट दिली आहे. 

स्मार्टफोनपासून तयार झालेला दानव आणि त्याच्याविरुद्ध रजनीकांतच्या ‘रोबोट’ चित्रपटातील ‘चिट्टी रोबोट’ या दोघांमधील संघर्ष अशी थीम या टीझरमधून दाखवण्यात आली आहे. केवळ दीड मिनिटांच्या या टीझरला अर्ध्या तासातच दोन लाखांहून अधिक हिट्स मिळाले आहेत. यावरूनच या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता दिसून येते.   

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link