Next
‘ट्रॅव्हलएक्सपी’ ‘यूके’च्या मुख्य बाजारपेठेत उतरणार
प्रेस रिलीज
Thursday, April 26 | 01:52 PM
15 0 0
Share this story

मुंबई : जगातील आघाडीचे पर्यटनविषयक आणि ७५ दशलक्ष घरांत पोहोचलेले चॅनेल, तसेच प्रमुख प्रवाहातील प्रेक्षकांसाठी वैविध्यपूर्ण संस्कृतींवर आधारित कंटेट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ट्रॅव्हलएक्सपी चॅनेलने आणखी एका प्रमुख आंतरराष्ट्रीय टीव्हीबाजारपेठेत प्रवेश केला आहे.

ट्रॅव्हलएक्सपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत चोथानी म्हणाले, ‘३० एप्रिल २०१८ पासून ट्रॅव्हलएक्सपी फ्रीव्ह्यू डिजिटल टेरेस्ट्रियल टेक्नॉलॉजी (डीटीटी) प्लॅटफॉर्मद्वारे इंग्लंडमध्ये लाँच केले जाणार असल्याचे जाहीर करताना मला आनंद होत आहे. इंग्लंडमध्ये बाजारपेठेतील हिश्श्याच्या बाबतीत व्यासपीठाला सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभलेली आहे. आम्हाला खात्री आहे, की आमचे लोकप्रिय, उच्चभ्रू प्रवासविषयक मनोरंजक आणि माहिती- मनोरंजनावर आधारित कार्यक्रम किमान १६ दशलक्ष ‘फ्रीव्ह्यू’ नोंदणीदारांना जोडेल. फ्रीव्ह्यू प्लॅटफॉर्मशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांच्यामुळे आम्हाला इंग्लंडमधील प्रेक्षकवर्गासाठी सादर करण्यात आलेले पहिले भारतीय टीव्ही चॅनेल बनणे शक्य झाले. त्यांच्याबरोबर दीर्घकालीन परस्पर फायद्याची भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत.’

प्रशांत चोथानीइंग्लंडमधील ९९ टक्के घरांत असलेल्या उपलब्ध असलेल्या फ्रीव्ह्यू प्लॅटफॉर्मवर ट्रॅव्हलएक्सपी सादर झाल्याने जगभरात ट्रॅव्हलएक्सपी उपलब्ध असलेल्या घरांची ७५ दशलक्ष संख्येत १६ दशलक्षांची वाढ होणार आहे. २००८ नंतर इंग्लंडमध्ये तयार झालेल्या प्रत्येक टीव्हीमध्ये फ्रीव्ह्यूची ट्यूनरची सोय आहे, ज्यामुळे ‘फ्रीव्ह्यू’चे चॅनेल्स दाखवणे शक्य होते. याचे कामकाज डीटीव्ही सर्व्हिसेस लिमिटेडकडून हाताळले जाते. ही कंपनी बीबीसी, आयटीव्ही, चॅनेल फोर, स्काय आणि ट्रान्समीटर ऑपरेटर अरक्विवा यांच्यातील संयुक्त भागिदारी आहे.

ट्रॅव्हलएक्सपीद्वारे इंग्लंडच्या प्रेक्षकांसाठीही स्थानिक कंटेट तयार केला जाणार आहे. त्याचे नेतृत्व ट्रॅव्हलएक्सपी युरोपचे व्यवस्थापकीय संचालक सुमंत बहल यांच्याद्वारे केले जाणार असून, ते ग्रेटर लंडन कार्यालयातून ट्रॅव्हलएक्सपी, युकेची आघाडीही सांभाळतात.

बहल म्हणाले, ‘सर्व प्रकारच्या कंटेंट निर्मितीसाठी आम्ही ओळखले जातो. आमचा भर कायमच संपूर्ण प्रेक्षकवर्गावर असतो. आम्ही कधीच आमच्या व्याप्तीला मर्यादा पडतील अशाप्रकारे केवळ एखाद्या विशिष्ट समाजासाठी कंटेंट निर्मिती करत नाही. इंग्लंडमधील प्रेक्षकांसाठी आम्ही आमच्या १००० तासांच्या संग्रहालयातून जागतिक दर्जाचा सर्वप्यापी कंटेंट उपलब्ध करणार आहोतच, शिवाय इंग्लंडमध्येच तितक्याच आकर्षक कंटेंटची निर्मिती करणार आहोत. तेथील प्रेक्षकांसाठी डेस्टिनेशन, खाद्यपदार्थ, संस्कृती, निसर्ग, वारसा, जीवनशैली आणि इतर बऱ्याच प्रकारचा कंटेंट तयार केला जाणार आहे. अशाप्रकारे स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेला कंटेंट इंग्लंडच्या प्रेक्षकांच्या आवडीचा असेलच शिवाय आमच्या सातत्याने विकसित होणाऱ्या संग्रहालयातही त्यामुळे मोलाची भर पडेल.’

आपल्या वैविध्यपूर्ण आणि सुंदर पर्यटनविषयक कंटेंटसाठी ट्रॅव्हलएक्सपीने आक्रमक विपणन योजना आखली असून, त्याद्वारे इंग्लंडमधील प्रमुख प्रेक्षकवर्गावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या योजनेमध्ये प्रमुख प्रकारच्या टीव्हीवर टीव्ही कॅम्पेन्स आणि संपूर्ण इंग्लंडमध्ये बसेस, भुयारी मार्गावर बिलबोर्ड्स, सोशल मीडिया या व इतर उपक्रमांचा समावेश असेल.

असामान्य पर्यटनविषयक कंटेंट आणि प्रसारण दर्जा असलेल्या ट्रॅव्हलएक्सपीचे प्रसारण व नेतृत्व प्रशांत चोथांनी सीएमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारीव व निशा चोथानी, संचालक व कंटेंटप्रमुख यांच्यातर्फे केले जाते. दोघांकडे मीडिया क्षेत्राचा ५५ वर्षांचा एकत्रित अनुभव आहे, ज्यामुळे २०११ मध्ये लाँच झाल्यापासून केवळ सात वर्षांच्या कालावधीत ट्रॅव्हलएक्सपी जगातील आघाडीचे पर्यटनविषयक चॅनेल बनले आहे.

ट्रॅव्हलएक्सपी विविध देशांत इंग्रजी, जर्मनी, झेक, स्लोव्हेनियन, सर्बेयन, क्रोएशियन आणि बल्गेरियन अशा स्थानिक भाषांतही उपलब्ध असून इतर बऱ्याच भाषांत सुरू केले जाणार आहे. भारतीय भाषांपैकी ते हिंदी, तमिळ व बंगालीमध्ये उपलब्ध असून जवळच्या भविष्यात इतर विविध भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

कंपनकडे संपूर्णपणे स्वतःच्या मालकीच्या तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधा आणि सर्वोत्तम दर्जाची उपकरणे असून, त्याच्या सहाय्याने ट्रॅव्हलएक्सपीचा कुशल कर्मचारी वर्ग अतिशय दर्जेदार प्रोग्रॅमिंग तयार करतो आणि नवे जागतिक मापदंड प्रस्थापित करतो. गेल्याच आठवड्यात त्यांनी दोन नवे शो लाँच करत असल्याची घोषणा केली. त्यात थाली- द ग्रेट इंडियन मील आणि सिटी ब्रेक्स उझबेकिस्तान मालिका यांचा समावेश असून त्या सात जागतिक व तीन भारतीय भाषांत तयार केल्या जाणार आहेत. ट्रॅव्हलएक्सपी हे फोरके एचडीआर तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक आघाडीवर असून चॅनेलवरील सर्व शोज कंपनीअंतर्गत तयार केलेले व जागतिक प्रेक्षकांना आपलेसे वाटणारे असतात.

‘इंग्लंडमध्ये फ्रीव्ह्यूवर लाँच होणे हे पर्यटन प्रेमींना पर्यटन आणि जीवनशैली क्षेत्रातील सर्वोत्तम देण्याचे आमचे ध्येय पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल असून त्याद्वारे त्यांना घरहाबाहेर पडण्यासाठी आणि स्वतःहून जगाचा अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे,’ असे चोथानी म्हणाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link