Next
गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता यात्रेचे आयोजन
BOI
Friday, September 28, 2018 | 03:29 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘माय अर्थ फाउंडेशन आणि एन्व्हार्नमेंट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंतीनिमित्त आदर्श पुणे अभियान-स्वच्छता यात्रेचे आयोजन करण्यात येणार असून, सकाळी ९.३० वाजता यात्रेस प्रारंभ होईल,’ अशी माहिती ‘माय अर्थ’चे अध्यक्ष अनंत घरत यांनी दिली.

महा एनजीओ फेडरेशन संस्था देखील या अभियानात सहभागी होणार आहे. स्वच्छता यात्रेला पर्वती पायथा शनी मंदिर येथून प्रारंभ होऊन जनता वसाहत मार्गे वाघजाई माता चौक, जनता वसाहत येथे यात्रेचा समारोप होईल. गांधीजींच्या वेशभूषेत मुलांचा सहभाग असेल.

परिसरातील नागरिकांनी स्वच्छता यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search