Next
‘बालोद्यान’मध्ये रंगली रोबोटिक कार्यशाळा
प्रेस रिलीज
Thursday, November 22, 2018 | 03:22 PM
15 0 0
Share this story

रोबोटिक कार्यशाळेत सहभागी झालेल्या ‘बालोद्यान’मधील विद्यार्थ्यांसह रोबोस्ट्रॉमचे सुधीर पाटील, वीर सेवा दलाचे पोपट अक्कोळे, अजित पाटील आदी पदाधिकारी.

अब्दुललाट : ‘सध्याच्या आधुनिक युगात शालेय विद्यार्थ्यांनादेखील प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान व तंत्रज्ञान अनुभवता यावे; त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी रोबोटिक कार्यशाळांची गरज आहे’, असे मत रोबोस्ट्रॉम एज्युकेशन सेंटर प्रा. लि.चे सुधीर पाटील यांनी व्यक्त केले. अब्दुललाट येथील बालोदयान संस्थेत रोबोटिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, तिच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वीर सेवा दलाचे मध्यवर्ती सदस्य पोपट अक्कोळे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. 

वीर सेवा दलाच्यावतीने भविष्यात हुपरी, कोरोची, रांगोळी, इंगळी, कुंभोज, आळते, जयसिंगपूर, सांगली आणि नरंदे येथील शाळांमध्ये अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रांतीय प्रमुख अजित पाटील  यांनी सांगितले. 

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विपुल पाटील, केदार गगनग्रास यांनी रोबोटची कार्यप्रणाली, त्याचे उपयोग याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना रोबोटिक क्रेन बनविण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. विद्य्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे समाधानही त्यांनी केले. 

या वेळी वीर सेवा दलाचे जिल्हाप्रमुख समोशरण भोकरे, सचिव संतोष मगदूम, तालुका प्रमुख आशिष देसाई, प्रांत सदस्य सुदर्शन पाटील, जिल्हा सदस्य प्रवीण घाली, तालुका सदस्य उल्हास गेवराई, नरेश भोकरे, गुरव सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कारदगे यांनी, तर आभार प्रांतीय सचिव विजय बरगाले यांनी मानले.

 (‘बालोद्यान’च्या कार्याची ओळख करून देणारा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link