Next
‘कांचनजुंगा इको इक्स्पेडीशन’चा तिरंगा ध्वजप्रदान कार्यक्रम उत्साहात
प्रेस रिलीज
Monday, March 25, 2019 | 11:47 AM
15 0 0
Share this article:



पुणे : गिरीप्रेमीच्या महत्त्वाकांक्षी ‘कांचनजुंगा इको इक्स्पेडीशन २०१९’चा तिरंगा इंडो शॉटल ऑटो पार्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष विजय पुसाळकर  आणि एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते मोहीम नेते उमेश झिरपे व त्यांच्या संघाला प्रदान करण्यात आला.

एप्रिल-मे २०१९मध्ये देशातील सर्वोच्च शिखर माउंट कांचनजुंगावर गिरीप्रेमीने भारतातील सर्वांत मोठी नागरी मोहीम आयोजित केली असून मोहिमेचा संघ ३१ मार्च २०१९ रोजी रवाना होणार आहे. या मोहिमेचा तिरंगा ध्वजप्रदान कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यात प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक संचालक प्रमोद चौधरी, एन्प्रो इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकृष्ण करकरे, विद्या व्हॅली स्कूलच्या मुख्याध्यापिका नलिनी सेनगुप्ता, विद्या व्हॅली स्कूलचे संचालक विवेक गुप्ता, गिरिप्रेमीचे पाठीराखे रवी परांजपे, गिरीप्रेमीच्या संस्थापिका- अध्यक्षा उषःप्रभा पागे यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला गिरीप्रेमीचे सदस्य, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search