Next
पुण्यात ‘एचडीएफसी बँके’तर्फे ‘ट्रॅफिक पाठशाळा’
प्रेस रिलीज
Monday, August 20 | 02:16 PM
15 0 0
Share this story

‘एचडीएफसी बँक ट्रॅफिक पाठशाळा’ मोहिमेत बँकेचे वरिष्ठ अधिकारी राकेशकुमार रेलान,‘सिटी कॅटालिस्ट’चे अध्यक्ष राजू थॉमस, रेडिओ मिरचीतील कर्मचारी आणि पुणे वाहतूक पोलीस दलातील अधिकारी सहभागी झाले होते.

पुणे : एचडीएफसी बँक आणि रेडिओ मिरची यांच्यातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरक्षित वाहतूकीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘एचडीएफसी बँक ट्रॅफिक पाठशाळा’ ही मोहीम राबविण्यात आली. २१ ऑगस्टपर्यंत ही वाहतूक जागरुकता मोहीम सुरू राहणार आहे. 

पुणे शहरातील हडपसर, घोरपडी, फातिमा नगर, एमजी रोड,  कोथरूड, बाणेर, औंध, पाषाण, हिंजवडी, खराडी, मगरपट्टा यांसारख्या तीस महत्वाच्या जंक्शन्सकवर या मोहिमेअंतर्गत वाहतूक नियमांबाबत माहिती देण्यात आली. या वेळी सिटी कॅटालिस्ट टीम, रेडिओ मिरचीतील कर्मचारी आणि पुणे वाहतूक पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.

एचडीएफसी बँकेच्या महाराष्ट्र विभागाच्या रिटेल शाखा बँकिंग विभागाचे विभागीय प्रमुख राकेश कुमार रेलान म्हणाले, ‘या उपक्रमासाठी पुणे पोलीस व रेडिओ मिरचीशी भागीदारी करून आम्हाला आनंद होत आहे. आम्ही काम करत असलेल्या समाजाचे ऋण फेडणे फार महत्वाचे असते, यावर एचडीएफसी बँकेचा विश्वास आहे. ट्रॅफिक पाठशाळा या उपक्रमाच्या माध्यमातून, रस्ते वाहतूक सुरक्षित होण्यासाठी शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी काय करावे व काय करू नये याची माहिती देणे हे आमचे ध्येय आहे.’

रस्ते अपघात व त्यामुळे होणाऱ्या मृत्युंची वाढती संख्या आणि वाहतूक नियम मोडण्याचे वाढते प्रमाण पाहता सर्वसामान्य लोकांना रस्ता सुरक्षेविषयी जागरुक करण्यावर या मोहिमेचे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

‘सिटी कॅटालिस्ट’चे अध्यक्ष राजू थॉमस म्हणाले, ‘भारतीय रस्त्यांवर आजकाल अशक्य अशा वाहतूक समस्या निर्माण होत चालल्या असून, यामुळे गंभीर अपघात खूपच होऊ लागले आहेत. या समस्या वाहनांची प्रचंड संख्या, बेपर्वा ड्रायव्हिंग आणि वाईट इन्फ्रास्ट्रक्चर या तीन घटकांमुळे निर्माण होतात. या समस्या केवळ राजकारणी लोक किंवा प्रशासनावर सोडून देणे योग्य नाही. सुरक्षित वाहतूक सवयी अंगिकारण्यासाठी सामान्य नागरिकांनीच एकत्र येऊन सक्रीय पावले उचलणे गरजेचे असून, अधिक चांगले इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी; तसेच कायद्यांची सुनिश्चित अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला भरीस पाडण्याचे कामही सामान्य नागरिक करू शकतात.’

या वेळी विविध फलकांचा वापर करून लोकांनी वाहतूकीचे नियम कसे पाळावेत हे सांगण्यात आले. या मोहिमेंतर्गत आयोजित करण्यात आलेले आणखी एक महत्वाचे सत्र म्हणजे, निवासी संकुले व कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही वाहतूक सत्रांचे आयोजन करण्यात आले. वाहतूक सुरक्षा पत्रकांचे वितरण करून या वाहतूक सुरक्षा सत्रांमध्ये निवासी नागरिक व कॉर्पोरेट अधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link