Next
बँक ऑफ महाराष्ट्रचा महाचैतन्य दिवस
प्रेस रिलीज
Tuesday, February 13 | 12:37 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ या महाराष्ट्राच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील प्रमुख बँकेतर्फे आठ फेब्रुवारी २०१८ रोजी, ८३वा व्यवसाय आरंभ दिन ‘महाचैतन्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. पुणेस्थित बँकेतील कर्मचाऱ्यांनी यानिमित्ताने सांस्कृतिक संध्येचे आयोजन केले होते.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हणाले, ‘भारत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करत आहे आणि बँक सेवांमध्येही आमूलाग्र बदल होत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रसाठीही या प्रगतीचा एक भाग बनणं अत्यावश्यक आहे आणि ते साध्य करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने, बँकेची उन्नती जलद गतीने व्हावी यासाठी स्वतःला पुन्हा एकदा समर्पित करणे गरजेचे आहे.’ या वेळी त्यांनी बँकेच्या धोरणांचा पुनरुच्चार केला; तसेच सर्व्हायल किटच्या समाविष्ट मुद्द्यांचे नव्या जोमात आणि नव्या उत्साहात समर्पित भावनेने पालन करण्यासाठी, कर्मचाऱ्यांना आवाहन केले.

‘रिटेल, शेती आणि एसएमई क्षेत्रातील व्यवसायवृद्धी व्हावी, यावर लक्ष केंद्रीत करून विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले आहे. नियमितपणे काम करणे, प्रामाणिकपणा आणि कर्मचाऱ्यांचे समर्पित होऊन काम करणे, यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र बदल घडवेल आणि उच्चतम विकास, नफा आणि उच्चतम अॅसेट क्वालिटीसाठी सक्षम होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link