Next
‘येस बॅंके’ला ‘केअर रेटिंग’द्वारे ‘एएए’ दर्जा
प्रेस रिलीज
Saturday, July 07, 2018 | 11:38 AM
15 0 0
Share this story

मुंबई : भारताच्या खासगी क्षेत्रामधील चौथ्या क्रमांकाची बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘येस बॅंके’ला ‘केअर रेटिंग’द्वारे विविध गटांसाठी पतनामांकन सुधारित दर्जा मिळाला आहे. या दर्जामुळे ‘येस बॅंके’ची वित्तीय कामगिरी, पतपात्रता, चालू खात्यांच्या संख्येत वाढ, तसेच रिटेल ठेवींचा वाटा वाढणार आहे.

‘केअर रेटिंग’ने पतनामांकन सुधारित दर्जा ठरविताना पुरेशी भांडवलीकरण पातळी, अनुभवी वरिष्ठ व्यवस्थापन, गेल्या दशकभरात सातत्याने नफ्यात झालेली वाढ, इतर बॅंकांच्या तुलनेत मालमत्तेचा चांगला दर्जा, ‘एनसीएलटी’कडील (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) प्रकरणांची कमी संख्या, अर्थपुरवठ्याच्या रचनेत सुधारणा, गेल्या काही वर्षांमध्ये ठेवींवरील विश्वासामुळे उत्तम तरलता रचना या मुद्यांचा विचार केला आहे.

‘येस बॅंके’च्या या श्रेणी सुधारतेबद्दल बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर म्हणाले, ‘केअर रेटिंगद्वारे मिळालेला हा सुधारित पतनामांकन दर्जा म्हणजे बॅंकेच्या वृद्धी विकास व्यवसाय संचरनेला मिळालेली पावती आहे. ‘येस बॅंके’ने जोखीम व्यवस्थापन धोरण, चांगल्या मालमत्तांचे संरक्षण, वाढलेल्या शाखा आणि भक्कम व्यवस्थापकीय टीम या सर्वांमुळे हा दर्जा बॅंकेला मिळवता आला आहे. या रेटिंगमुळे भविष्यात आमच्या उधारीवरील खर्चात कपात होईल. त्याचा लाभ गुंतवणुकदारांना तसेच भागधारकांना होईल. आमच्या १४व्या वर्षामधील या प्रगतीमुळे ‘येस बॅंके’च्या बलस्थानांवर, तसेच भारतामध्ये जगातील सर्वोत्तम दर्जाची बॅंक निर्माण करण्याच्या आमच्या ध्येयावर शिक्कामोर्तब झाले.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link