Next
‘पत्रकारांत विश्लेषण क्षमता हवी’
संपादक वसंत भोसले यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Saturday, July 13, 2019 | 04:01 PM
15 0 0
Share this article:

पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले. या वेळी (डावीकडून) डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. निशा पवार.

कोल्हापूर : ‘पत्रकार होण्यासाठी सातत्याने वाचन करणे आवश्यक आहे. निरीक्षण, वस्तुनिष्ठ माहिती, नेमके संदर्भ, तसेच विश्लेषण क्षमता वाढविल्यास पत्रकारितेत उत्तम करिअर करता येईल,’ असे प्रतिपादन दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी त्यांनी मार्गदर्शन केले. विभागप्रमुख डॉ. निशा पवार यांनी स्वागत केले. डॉ. शिवाजी जाधव यांनी वसंत भोसले यांचा परिचय करून दिला.

वसंत भोसले म्हणाले, ‘पत्रकारिता दिवसेंदिवस बदलत आहे. पत्रकारांसमोरची आव्हाने वाढली आहेत. पत्रकार होण्यासाठी इतिहास, कला, साहित्य, संस्कृती, अर्थकारण, राजकारण यासह समकालीन घटना, घडामोडींचे वाचन करणे गरजेचे आहे. भारतीय समाज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वसला आहे. ग्रामीण अर्थकारण, समाजकारण, ग्रामसंस्कृती, शेती, पाणीप्रश्नर, शिक्षण, आरोग्य आदी विषय पत्रकारांनी समजून घ्यावेत. निरीक्षणातून खूप माहिती मिळते. ही माहिती वाचकांपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचवता येते. लिखाण करत असताना अचूक माहिती आणि नेमके संदर्भ देण्यावर भर द्यावा. सामाजिक बदलाची नोंद घेऊन ते बदल आपल्या वाचक-श्रोत्यांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. चालू घडामोडींविषयी पत्रकारांनी अधिक दक्ष असले पाहिजे. घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचे परिणाम काय होऊ शकतात, याचा अंदाज पत्रकारांना यायला हवा. प्रत्येक पत्रकाराकडे घटनांच्या विश्लेाषणाची क्षमता हवी’.

डॉ. शिवाजी जाधव यांनी आभार मानले. या वेळी डॉ. सुमेधा साळुंखे उपस्थित होत्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search