Next
श्री. कृ. कोल्हटकर, कमलाकर सारंग
BOI
Friday, June 29 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे अजरामर स्फूर्तिदायी महाराष्ट्रगीत रचणारे कवी आणि ज्येष्ठ लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि नाट्यदिग्दर्शक व अभिनेते कमलाकर सारंग यांचा २९ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय....
....

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

२९ जून १८७१ रोजी नागपूरमध्ये जन्मलेले श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे आद्य विनोदी लेखक, नाटककार आणि कवी म्हणून सर्वज्ञात आहेत.

‘सुदाम्याचे पोहे’ या श्रेष्ठ विनोदी पुस्तकातून त्यांनी व्यंगोक्ती, वक्रोक्ती, अतिशयोक्ती वगैरे अनेक घटकांचं दर्शन घडवलं. न. चिं. केळकरांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलं होतं- ‘काव्य करण्याप्रमाणे विनोदी लेखन करण्यास उज्ज्वल प्रतिभा लागते...विनोदी लेख लिहिता येणे ही एक ईश्वरी देणगी आहे... पुस्तक वाचणाऱ्यास निबंधकाराच्या अंगी असलेली वस्तुनिरीक्षणाची दृष्टी, मार्मिकपणा, गहन विचारशक्ती, उदाहरणे देण्याची हातोटी व सर्वांत मुख्य म्हटले म्हणजे कोणतीही गोष्ट हसू येईल व मौज वाटेल अशा रीतीने सांगण्याची कला या सर्वांबद्दल त्याचे अभिनंदन करावेसे वाटेल. ’

गुप्तमंजूषा, जन्मरहस्य, परिवर्तन, प्रेमशोधन, मतिविकार, मायाविवाह, मूकनायक, वधूपरीक्षा, वीरतनय, शिवपावित्र्य, श्रमसाफल्य, सहचारिणी, अशी त्यांची जवळपास १२ नाटकं प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त अठरा धान्यांचे कडबोळे, श्यामसुंदर, ज्योतिषगणित अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. १९२७ साली पुण्यात झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

एक जून १९३४ रोजी त्यांचं निधन झालं. 

(श्री. कृ. कोल्हटकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
....

कमलाकर जयराम सारंग

२९ जून १९३४ रोजी जन्मलेले कमलाकर जयराम सारंग हे नाट्यअभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होते. 
आरोप, घरटे आमुचे छान, बेबी, जंगली कबुतर, अशी त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं रंगभूमीवर यशस्वी ठरली होती; पण त्यांचं सर्वांत मोठं काम म्हणजे तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाइंडर’चं त्यांनी केलेलं दिग्दर्शन आणि त्यात केलेली भूमिका. हे नाटक अश्लीलतेमुळे प्रचंड वादग्रस्त ठरलं आणि या नाटकाने इतिहास घडवला. अनेक अडचणींशी लढा देऊन सारंग पती-पत्नींनी हे नाटक दिमाखात सादर केलं होतं. त्या वेळच्या आठवणींवर सारंग यांनी ‘बाइंडरचे दिवस’ हे पुस्तक लिहिलं आणि तेही गाजलं.

२५ सप्टेंबर १९९८ रोजी कमलाकर सारंग यांचा मृत्यू झाला. 

(कमलाकर सारंग यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link