Next
डॉ. कलाम यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन
BOI
Tuesday, October 09, 2018 | 03:14 PM
15 0 0
Share this article:

डॉ. एपीजे अब्दुल कलामपुणे : साहित्यवेध प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्ताने व वाचक प्रेरणा दिनानिमित्ताने ‘कलाम पर्व’ या फोटोबायोग्राफी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४, १५ व १६ ऑक्टोबर २०१८ रोजी बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन पुणेकर विज्ञानप्रेमींना पाहण्यासाठी खुले असणार आहे. 

या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी, दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व कलादालनात डीआरडीओचे डायरेक्टर जनरल प्रवीण कुमार मेहता यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीआरडीओचे निवृत्त डायरेक्टर जनरल डॉ. सुभाषचंद्र सती, तर प्रमुख पाहुणे म्हणून एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी असणार आहेत. कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विज्ञानभारतीचे सहकार्यवाह मुकुंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 ‘तरुण, विद्यार्थी यांच्यासह इतरांना विज्ञानविषयक ज्ञान व्हावे. डॉ. कलाम यांच्या विचारातून सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे, या हेतूने डॉ. कलाम यांच्या बालपणासून ते अखेरच्या क्षणापर्यंतची छायाचित्रे, त्यांचे विचार वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर डीआरडीओ, एआरडीई, पाषाण व आर अँड डी ई, दिघी येथील क्षेपणास्त्रांच्या प्रतिकृती व दुर्मिळ फोटो असणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, तरी सर्व विज्ञानप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा’, असे आवाहन साहित्यवेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास भिंगारे यांनी केले.   

कार्यक्रमाविषयी 
कलाम पर्व फोटोबायोग्राफी प्रदर्शन
स्थळ : बालगंधर्व कलादालन
वेळ : १४ ते १६ ऑक्टोबर, सकाळी ११ ते रात्री ८.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search