Next
पुणे येथे ‘किसान २०१८’ प्रदर्शनाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Friday, December 14, 2018 | 02:41 PM
15 0 0
Share this storyपुणे : मोशी येथे ‘किसान २०१८’ या भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. दर वर्षीच्या प्रथेप्रमाणे पहिल्या येणार्‍या शेतकर्‍यांच्या गटाने या २८व्या प्रदर्शनाचे हे उद्घाटन केले. हे प्रदर्शन १२ ते १६ डिसेंबर २०१८ या कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाला पालकमंत्री गिरीश बापट यांनी भेट दिली.

उद्घाटन करणाऱ्यांमध्ये बादलवाडी (बुलढाणा) येथील गजानन उबरहांडे, मारूती उबरहांडे, शुभम उबरहांडे, गणेश उबरहांडे, अनिल उबरहांडे, श्रीकृष्णा उबरहांडे, मंगेश उबरहांडे, प्रमोद उबरहांडे, मंगेश उबरहांडे, प्रमोद उबरहांडे, जालन्यातील तुपेवाडीतील राम कफरे, रघुनाथ मोरे, काशिनाथ मगर, सुखदेव खेडेकर, निभानी कफरे या शेतकर्‍यांचा समावेश होता. १५ एकर प्रदर्शन क्षेत्रावर ६००हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनात पाच दिवसांमध्ये देशभरातून सुमारे दोन लाखांहून अधिक शेतकरी भेट देतील, असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.यंदा या प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री,  पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व  शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ विभागातील स्टॉल शेतकर्‍यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार्‍या १००हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असेल. भारतीय कृषी अनुसंधान परिषद व त्यांच्या संशोधन संस्थाचाही कृषी प्रदर्शनात सहभाग असणार आहे.

मोबाइलचा वाढता वापर आणि डिजिटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकर्‍यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकर्‍यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणार्‍या संधींची माहिती घेऊ शकतील.

आंतरराष्ट्रीय दालनात चीन, तैवान व युरोप मधील कंपन्यांचा सहभाग आहे. मुख्यत्वे छोटी यंत्रे व अवजारे या ठिकाणी प्रदर्शित होत आहेत. भारतीय शेतकर्‍यांच्या गरजा व बाजारपेठ जाणून घेणे, भारतात विक्री प्रतिनिधी नेमणे, हा या कंपन्यांचा उद्देश आहे. हे दालन प्रदर्शनाचे पहिले तीन दिवस म्हणजे १२ ते १४ डिसेंबर या दरम्याने खुले असेल.प्रदर्शन प्रवेशासाठी १०० रुपये नावनोंदणी शुल्क असून, पूर्व नावनोंदणीची सुविधा संकेतस्थळावर व मोबाइल अ‍ॅपवर उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर केल्यास प्रदर्शनस्थळी येणार्‍या शेतकर्‍यांचा वेळ वाचेल. पूर्वनोंदणी करणार्‍यांना प्रवेश शुल्कात ५० रुपयांची सवलत मिळणार आहे.

प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावर शेतकर्‍यांचा वेळ वाचवण्यासाठी, मोबाइल अ‍ॅपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सोय केली आहे. आत्तापर्यंत पाच हजार शेतकऱ्यांनी या प्रदर्शनासाठी नावनोंदणी केली असून, ही संख्या ५० हजारांचा आकडा ओलांडण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

मोशी येथील प्रदर्शनस्थळ हे पुणे शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असून, प्रदर्शनस्थळी जाण्यासाठी पुण्याच्या शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल बस स्टॉपपासून बसची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नाव नोंदणीसाठी वेबसाइट : kisan.net
मोबाइल अ‍ॅप : kisan.net
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link