Next
‘मासिक पाळीविषयी संवाद हवा’
डॉक्टर सुवर्णा घुमरे यांचे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन
BOI
Thursday, November 01, 2018 | 11:11 AM
15 0 0
Share this article:नाशिक :
‘मासिक पाळी हा विषय अजूनही मोकळेपणाने बोलण्यासारखा वाटत नाही. किशोरवयीन मुलींमध्ये याबद्दलच्या जागृतीचा अभाव असल्याने अनेक किशोरवयीन मुलींमध्ये गुप्तांगाच्या व्याधीचे प्रमाण वाढते आहे. या शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जाताना घ्यायच्या काळजीबद्दल या मुलींमध्ये अनभिज्ञता दिसून येते. म्हणूनच या मुलींना शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन डॉ. सुवर्णा घुमरे यांनी केले.

निव्होकेअर फार्मास्युटिकल्स संचालित निव्होप्रेरणा फाउंडेशनच्या ‘आवाज’ उपक्रमांतर्गत डॉ. सुवर्णा घुमरे यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम नाशिक महानगरपालिकेच्या जेलरोड येथील शाळा क्रमांक ५६ मध्ये आयोजित करण्यात आला होता. ‘किशोरवयीन मुलींनी काही शारीरिक समस्या जाणवत असल्यास किमान शिक्षिकांशी बोलून दाखवल्या पाहिजेत, त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. आज अनेक शासकीय कार्यालये आणि इतर ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्सचे मशीन बसवलेले आहे. निरनिराळ्या कल्याणकारी संस्था किशोरवयीन मुलींसाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये मशीन भेट देत असतात. त्याचा वापर किशोरवयीन मुलींनी केला पाहिजे. घडणारे बदल स्वीकारून आपल्या आरोग्याची काळजी स्वतःच घेतली पाहिजे,’ असे डॉक्टर घुमरे म्हणाल्या. 

मुख्याध्यापिका राजश्री गांगुर्डे, निव्होकेअर फार्मास्युटिकल्सचे विभागीय व्यवस्थापक हृषीकेश शिंदे, उपशिक्षिका सविता जाधव, डॉ. संजय घुमरे, गणेश भदाने, चंद्रकांत गायकवाड आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. मासिक पाळीबाबत असणारे मुलींचे समज-गैरसमज, किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल, योग्य आहार, आरोग्याशी निगडित समस्या यावर घुमरे यांनी माहिती दिली. ‘या उपक्रमांमुळे अज्ञानाचा पडदा दूर होऊन मुली सबळ होतील,’ असे प्रतिपादन मुख्याध्यापिका गांगुर्डे यांनी केले. 

प्रास्तविकात शिंदे यांनी आवाज व साक्षर क्रांती उपक्रमाचे महत्व सांगितले. आवाज उपक्रम विद्यालयात राबविल्याबद्दल उपशिक्षिका सविता जाधव यांनी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय घुमरे, डॉ. सुवर्णा घुमरे व निव्होप्रेरणा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन निव्होकेअर फार्मास्युटिकल्सचे नाशिक विभागप्रमुख गणेश भदाणे यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search