Next
‘घरोघरी गोसेवा व्हावी’
प्रेस रिलीज
Monday, March 18, 2019 | 06:00 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘गो-संगोपनाचे महत्त्व भारतीय कृषी आणि अर्थकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने घरोघरी गोसेवा व्हावी, गायीचे धर्मापलीकडचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवावे,’ असे आवाहन राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री डॉ. वल्लभभाई कठिरिया यांनी पुण्यात केले.

गोसेवा, गो-संगोपन आणि कृषी क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, संघ परिवारातील स्वयंसेवक कार्यकर्त्यांची अनौपचारिक  बैठक १७ मार्च २०१९ रोजी पार्वती येथील कौशिकाश्रम येथे झाली. त्या वेळी सर्वांशी संवाद साधताना डॉ. कठिरिया बोलत होते. गोसेवा समिती आणि आरोग्यभारती या संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी भूषविले. डॉ. शरद खरे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी राजेंद्र लुंकड, प्रदीप फासे, डॉ. सुहास गटणे यांच्यासह ४० संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ कठिरिया म्हणाले, ‘गोसेवा, गो-संगोपनाबद्दल आजही समाजात गैरसमज आहेत. गोसेवा हा विषय धार्मिक नाही, तर कृषीविषयक, शास्त्रीय आणि आर्थिक आहे. भावना, आस्था, श्रद्धेच्या पलीकडे समाजात गोसेवा पोहोचवली पाहिजे. त्यामुळे पर्यावरण, शेती, शेतकऱ्यांना मदत होईल. संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासासाठी जी उद्दिष्टे सर्वांसमोर ठेवली आहेत, ती पूर्ण करताना गोपालन उपयुक्त ठरणार आहे. शहरातही विकास आराखड्यात गोपालनासाठी राखीव भूखंड ठेवले पाहिजेत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search