Next
पटवर्धन हायस्कूलच्या ३३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
BOI
Tuesday, August 07, 2018 | 06:22 PM
15 1 0
Share this story

पटवर्धन हायस्कूलमधील शिष्यवृत्ती मिळविलेल्या ३३ विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक व संस्थेचे पदाधिकारी.

रत्नागिरी : ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे’तर्फे फेब्रुवारी २०१८मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलचे ३३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. पाचवीतील २१ आणि आठवीतील १२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे. पाचवीतील गार्गी जोशी व मीत सोलंकी यांनी जिल्ह्यात अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. सर्व गुणवंतांची नावे खाली दिली आहेत.

पाचवीच्या विद्यार्थ्यांना मनाली नाईक, सुदेश गोरे, माणिक भोये, कौस्तुभ पालकर, रूपा शेट्ये, सुनीता अहिरे, मीना ताडे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिभा बंडबे, अजित मुळीक, प्रीता पाटणकर, राजेश पालकर, अजय कुराडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, मुख्याध्यापक विजय वाघमारे, उपमुख्याध्यापक मिलिंद कदम, भारत शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह सुनील वणजू, खजिनदार चंद्रकांत घवाळी, कार्यकारी सदस्य विश्वनाथ शिंदे, सीए नचिकेत जोशी, धनेश रायकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

शिष्यवृत्ती मिळविलेले पाचवीतील विद्यार्थी आणि त्यांचा जिल्हा गुणानुक्रम :
गार्गी जोशी - २, मीत सोलंकी - ३, अथर्व गोरे - ५, तन्वी कांबळे - १५, तन्मया आखाडे - २८, आदिती काजरेकर - ४४, श्रेया कारेकर - ५१, गणेश साळुंखे - ५२, गुरुप्रसाद पटवर्धन - ५३, सिद्धिका ढवळ - ६०, सर्वेश म्हादये - ६३, संचिता सावंत - ७१, स्वरा मुळ्ये - ७२, मैत्रेय मालशे - ८५, श्वेता नागवेकर - ८६, तेजस ठावरे - ८७, तनया आंबेकर - ९१, आर्या शेलार - ९२, श्रुती मांडवकर - ९६, पर्णवी पाटील - १०४ आणि शिवानी मांडवकर - १११.

शिष्यवृत्ती मिळविलेले आठवीतील विद्यार्थी आणि त्यांचा जिल्हा गुणानुक्रम :
चैत्राली ताडे - १३, मिथिल जाधव - २१, नीरजा म्हैसकर - ४०, अनुश्री कुळ्ये - ४४, अथर्व कारेकर - ४८, सोहम पटवर्धन - ५१, श्रावणी सावंत - ५३, अवनीश सप्रे - ५८, निनाद शिंगाडे - ६२, स्वर्णव म्हादये - ७४, तन्वी मोरे - ७९, श्रुती नागवेकर - ९७.

(राज्याच्या निकालाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या निकालाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. दामले विद्यालयाच्या निकालाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link