Next
मुलांनी बनविलेल्या ‘बाघा’ लघुपटाला द्वितीय पुरस्कार
BOI
Thursday, August 02 | 06:05 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘एफटीआयआय’तर्फे जयपूरमध्ये घेण्यात आलेल्या फिल्म ओरिएन्टेशन कोर्समधील मुलांनी बनवलेल्या ‘बाघा’ या लघुपटाला पहिल्या जयपूर इंटरनॅशनल चिल्ड्रन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट विभागात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. २५ ते २७ जुलैदरम्यान या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पुण्यातील ‘एफटीआयआय’च्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांनी मिळवलेले हे यश ‘एफटीआयआय’साठी कौतुकाचे आहे. 

जूनमध्ये ‘एफटीआयआय’तर्फे जयपूरमध्ये चित्रपटांची तोंडओळख करून देणाऱ्या ‘स्किफ्ट’ या दहा दिवसांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ११ ते १६ वर्षे वयोगटातील ३० मुले सहभागी झाली होती. या शिबिरादरम्यान त्यांनी ‘बाघा’ हा लघुपट तयार केला. हा लघुपट चार मिनिटांचा असून, एक गरीब मुलगा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कसा मार्ग काढतो याची कथा मुलांनी यातून मांडली आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन मैत्रेय कुलश्रेष्ठ याने केले. दहा देशांमधील ३८ लघुपटांमधून या लघुपटाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या शिबिरात रितेश ताकसांडे यांनी मार्गदर्शन केले. राजस्थानच्या सांस्कृतिक विभागाच्या जवाहरलाल नेहरू कला केंद्राच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link