Next
‘न्युमरिक’ ‘प्रेस्टिजिअस ब्रॅंड ऑफ इंडिया’ने सन्मानित
प्रेस रिलीज
Saturday, May 12, 2018 | 01:50 PM
15 0 0
Share this story

‘प्रेस्टिजिअस ब्रॅंड ऑफ इंडिया २०१८’चा सन्मान स्वीकारताना ‘न्युमरिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पलाश नंदी (डावीकडे)

मुंबई : ‘न्युमरिक’ या भारतातील आघाडीच्या युपीएस उत्पादक व पॉवर क्वॉलिटी सोल्यूशन प्रदाता कंपनीला ‘प्रेस्टिजिअस ब्रॅंड ऑफ इंडिया २०१८’ने सन्मानित करण्यात आले. या ब्रॅंडने आपल्या अत्याधुनिक उत्पादने व सेवांच्या संयोजनासह भविष्याची निर्मिती करण्यासोबतच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

‘न्युमरिक’ व्यापक व प्रबळ उत्पादन रेंजसोबतच व्यापक सेवा देते. आपल्या विभागामध्ये ही ६०० व्हीए ते ४.८ एमव्हीएपर्यंत व्यापक उत्पादन रेंज असलेली बहुधा एकमेव कंपनी आहे. ही कंपनी लहान प्रकल्पांपासून मोठ्या डेटा सेंटर्सपर्यंत विविध उपयोजनांची पूर्तता करते. यासाठी व्यापक सेवा नेटवर्कचे साह्य लाभले आहे. ‘न्युमरिक’चे एकूण २५४ सर्व्हिस सेंटर्स आणि पूर्णतः इन-हाऊस असलेले ९०० क्षेत्रीय तंत्रज्ञ आहेत.

या यशाबाबत बोलताना ‘न्युमरिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पलाश नंदी म्हणाले, ‘आम्हाला ‘प्रेस्टिजिअस ब्रॅंड ऑफ इंडिया’ पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद होत आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना यशस्वीपणे सेवा देण्यासोबतच त्यांच्या गरजांची पूर्तता केली आहे. आमच्या उत्पादनाला विश्‍वास, प्रतिमा, स्थिरता, उत्तम कार्यक्षमता, समंजसपणा, स्थिती, ब्रॅंड रिकॉल, विकास, पोहोच, नाविन्यता अशा घटकांसंदर्भात ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.’

‘यासारख्या पुरस्कारांमुळे आम्हाला अधिक मेहनत घेत आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळते. ‘न्युमरिक’ने ली-ग्रॅंडसोबत केलेल्या सहयोगानंतर आम्हाला जगभरातील सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. स्थानिक बाजारपेठेबाबतचा आमचा अनुभव आम्हाला बाजारपेठेबाबत सखोल माहिती देतो. आम्ही आता स्वतःला जागतिक कौशल्य व स्थानिक माहिती असलेले ग्लोकल कंपनी मानतो. या सन्मानाला आम्हाला नव्या ऊंचीवर पोहोचण्यास मदत झाली आहे,’ असे नंदी यांनी सांगितले.

‘न्युमरिक’ उत्पादने ऊर्जा कार्यक्षम आहेत आणि हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘न्युमरिक’ची उत्पादने ९६ टक्के ऊर्जा कार्यक्षम असण्यासह भारतीय बाजारपेठेमधील सर्वात ऊर्जा कार्यक्षम उत्पादने मानली जातात. ‘प्रेस्टिजिअस ब्रॅंड्स ऑफ इंडिया २०१८’मध्ये प्रख्यात ब्रॅंड्सचा समावेश आहे, असे ब्रॅंड्स ज्यांनी आपल्या अत्याधुनिक उत्पादने व सेवांच्या संयोजनासह भविष्याची निर्मिती करण्यासोबतच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

हा पुरस्कार ब्रॅंडचे मूल्य, सामर्थ्य व पात्रतेला प्रशंसित करतो. प्रकल्पामध्ये भारतीय बाजारपेठेतील सर्वात प्रशंसनीय, नाविन्यपूर्ण व प्रबळ ब्रॅंड्सचा समावेश आहे. हे ब्रॅंड्स त्यांच्या अद्वितीय मूल्य तत्त्वे व गुणधर्मांसाठी ओळखले जातात आणि ते अतुलनीय मार्ग स्थापित करण्यासोबतच त्यांच्या ग्राहकांसोबत सखोल व अर्थपूर्ण विपणन संबंध निर्माण करतात.

‘न्युमरिक’विषयी :
‘न्युमरिक’ ही भारतातील आघाडीची युपीएस (अन-इंटरप्टिबल पॉवर सप्लाइज) उत्पादक व पॉवर क्वॉलिटी सोल्यूशन प्रदाता कंपनी आहे. १९८४मध्ये स्थापण्यात आलेली ‘न्युमरिक’ जागतिक दर्जाच्या पॉवर कंडिशनिंग उत्पादनांच्या माध्यमातून सर्व महत्त्वपूर्ण उपकरणे अधिक काळ चालू राहण्याच्या खात्रीसाठी वीज पुरवठा सुरू राहण्यासोबतच सुरक्षितता देते. संपूर्ण युजर विभागांसाठी एक विश्‍वसनीय पॉवर सोल्यूशन्स भागीदार असलेल्या ‘न्युमरिक’च्या उल्लेखनीय उत्पादनांमध्ये किओर टी, किओर एचपी, किओर एचपीई आणि ट्रिमोड एचई व आर्किमोड एचईसारख्या मॉड्युलर सोल्यूशन्सचा समावेश आहे.

‘न्युमरिक’ने सातत्याने व सक्रियपणे दर्जेदार व्यवसाय प्रक्रिया दिल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने वितरित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. कंपनी ISO 9001: 2008, ISO 14001:2015,OHSAS 18001:2007 प्रमाणित आहे. ही कंपनी गुणात्मक सर्वोत्तमतेच्या अविरत आवडीसाठी ओळखली जाते. ‘न्युमरिक’चे भारतातील युपीएस क्षेत्रामध्ये सर्वाधिक विक्री व सेवा नेटवर्क आहे. कंपनीच्या २५४हून अधिक सर्व्हिस सेंटर्समध्ये ९०० हून अधिक कारखान्याबाबत प्रशिक्षण घेतलेले क्षेत्रीय तंत्रज्ञ आहेत आणि कंपनीचे प्रबळ बॅक ऑफिस ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देते. ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी असलेले पाच जागतिक दर्जाची उत्पादन केंद्रे उत्तमरित्या प्रशिक्षित मनुष्यबळ, आधुनिक उत्पादन सुविधांनी युक्त आहेत आणि ही केंद्रे भारतात धोरणात्मकरित्या स्थित आहेत.

‘न्युमरिक’चा ‘बीएफएसआय’, सरकार, टेलिकॉम, हेल्थकेअर, आयटी/आयटीईएस, डेटासेंटर्स, प्रोसेस इंडस्ट्रीज व एसओएचओ अशा विविध क्षेत्रांमध्ये ग्राहकांचा सर्वोत्तम समूह आहे. यामधूनच कंपनीची प्रतिष्ठा आणि ब्रॅंड इक्विटी दिसून येते. ‘न्युमरिक’ गेल्या २४ वर्षांपासून क्रमांक एकची युपीएस आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी राहिली आहे (स्रोत : सॉफ्ट डिस्क अवॉर्ड्‌स). ‘न्युमरिक’ला ‘बेस्ट मॉड्युलर युपीएस फॉर द इअर २०१५’ने देखील सन्मानित करण्यात आले आहे (सॉफ्ट डिस्क अवॉर्ड्‌स २०१५). नुकतेच ईआरटीसी मीडियाने न्युमरिकला ‘इंडियाज गुडविल ब्रॅंड फॉर २०१७’ने सन्मानित केले.

‘न्युमरिक’ २०१२पासून इलेक्ट्रिकल व डिजिटल बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जागतिक स्पेशालिस्ट असलेल्या आणि ५.५ बिलियन युरो उलाढाल असलेल्या ली-ग्रॅंडची भाग आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link