Next
‘मदरहूड’तर्फे जागतिक स्तनपान सप्ताहाचे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, August 03, 2018 | 05:20 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील मदरहूड हॉस्पिटलतर्फे खराडी येथील केंद्रात एक ते सात ऑगस्टदरम्यान सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत जागतिक स्तनपान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहामध्ये स्तनपान, गर्भावस्थेचे व्यवस्थापन, नवजात बालकाची काळजी या विषयांवर डॉ. तुषार पारिख, डॉ. सचिन ठोसे, डॉ. मुबाशीर एच. शहा आणि आहारतज्ज्ञ डॉ. अलका बर्नवाल यांच्यातर्फे नि:शुल्क जागरूकता व परस्परसंवादी सत्रे घेणार आहेत. यात गरोदर माता आणि पित्यांसाठी खास सत्रे आणि मनोरंजक कार्यक्रम घेतले जातील. या संपूर्ण सप्ताहात गरोदर मातांना आहार, फिटनेस, प्रसूती व्यवस्थापन आणि मॅटर्निटी फॅशन याबाबत तज्ज्ञांकडून शंकानिरसन करून घेता येणार आहे आणि वैयक्तिक सल्लाही मिळेल.

गरोदर मातांसाठी हे सत्र संस्मरणीय व्हावे यासाठी मदरहूड हॉस्पिटलतर्फे पाच ऑगस्ट रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात फॅशन शो, पाककृती स्पर्धा, गट चर्चा आणि छायाचित्र प्रदर्शन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search