Next
‘व्होडाफोन’तर्फे ‘रेड पोस्टपेड’सोबत ‘अॅमेझॉन प्राइम’ची ऑफर
प्रेस रिलीज
Wednesday, June 27, 2018 | 04:50 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘रेड पोस्टपेड प्लॅन’ घेतलेल्या ‘व्होडाफोन’च्या सर्व ग्राहकांना ‘अॅमेझॉन प्राइम’चे एक वर्षाचे (९९९ रुपये मूल्याचे) सदस्यत्व देण्याचा निर्णय व्होडाफोन व अॅमेझॉन यांनी संयुक्तपणे घेतला. यासाठी या ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही.

ऑनलाइन करमणूक व शॉपिंग यांचे मोठे दालन ग्राहकांसाठी उघडण्यात येत आहे. प्राइम व्हिडिओ, प्राइम म्युझिक व अॅमेझॉन डॉट इन या साइटवरील लाखो उत्पादनांच्या व वस्तूंच्या खरेदीवर मोफत शिपिंग अशी ही सुविधा असणार आहे.

या ऑफरमुळे ‘व्होडाफोन’चे ग्राहक अमर्यादीत स्ट्रीमिंगचा लाभ कोठेही, केव्हाही घेऊ शकतील. त्यांना ‘प्राइम व्हिडिओ’मधून प्रीमियम चित्रपट व टीव्ही शो पाहायला मिळतील. हॉलिवूड, बॉलिवूड व इतर स्थानिक भाषांमधील नवीन व निवडक गाजलेले चित्रपट, टीव्हीवरील लोकप्रिय शो, विनोदी कार्यक्रम, मुलांचे कार्यक्रम ‘व्होडाफोन’च्या ग्राहकांना मोफत, अमर्यादीत स्वरूपात पाहायला मिळतीलच, शिवाय ‘प्राइम ओरिजिनल सीरीज’मधील ब्रेथ, इनसाईड एज, द ग्रॅन्ड टूर, अमेरिकन गॉड्स आणि आगामी कॉमिक्स्तान व टॉम क्लॅन्साचा जॅक रायन या कार्यक्रमांचा आनंदही घेता येईल.

याच्या जोडीला इंग्रजी, हिंदी, तामिळी, पंजाबी, तेलुगू, बंगाली व अन्य स्थानिक भाषांमधील लाखो गाणी व संगीत जाहिरातींच्या अडथळ्याशिवाय ‘ऑफलाइन डाउनलोड’ करता येईल. ‘अॅमेझॉन डॉट इन’वरील लाखो वस्तूंचे मोफत शिपिंग, त्वरीत डिलिव्हरी आणि टॉपच्या वस्तूंच्या व्यवहारांमध्ये सर्वात प्रथम प्रवेश अशा अनेकविध सुविधा ‘व्होडाफोन रेड प्लॅन’च्या ग्राहकांना मिळतील.

या ऑफरबद्दल ‘व्होडाफोन इंडिया’चे कन्झ्युमर बिझनेस विभागाचे सहसंचालक अवनीश खोसला म्हणाले, ‘सध्याच्या ‘डिजिटली सॅव्ही’ ग्राहकाला ‘कंटेंट’मध्ये जास्त स्वातंत्र्य आणि लवचिकता हवी असते. अॅमेझॉन व व्होडाफोन यांच्यातील या भागिदारीमुळे आमच्या ग्राहकाला हे या स्वरूपाचे कंटेट आणि आमची सर्वोत्तम सेवा देण्याचे आमचे उद्दिष्ट गाठले जात आहे. हजारो चित्रपट, व्हिडिओ, टीव्ही शो व गाणी यांचा आमच्या ग्राहकांना लाभ होणार आहे. व्होडाफोन रेड व अॅमेझॉन यांच्यामार्फत ग्राहकांना एकसंध स्वरूपात ऑनलाइन शॉपिंग व करमणूक मिळेल, याची आम्हाला खात्री आहे.’

‘अॅमेझॉन प्राइम इंडिया’चे प्रमुख व संचालक अक्षय साही म्हणाले, ‘व्होडाफोनशी भागिदारी करून आम्ही ‘अॅमेझॉन प्राइम’च्या सुविधा अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवीत आहोत. ‘व्होडाफोन’च्या पोस्टपेड ग्राहकांना आता ‘अॅमेझॉन प्राइम’ची सेवा ही त्यांच्या प्लॅनचा भाग म्हणूनच आपोआप मिळणार आहे. यातून त्यांना ‘व्होडाफोन’ची सेवा, ऑनलाइन शॉपिंग व करमणूक या तिन्ही गोष्टी अगदी मोफत व सुलभतेने मिळणार आहेत. आमचा विश्वास आहे की या सदस्यांना प्राइमचे अनेक फायदे आवडतील. ‘अॅमेझॉन प्राइम म्युझिक’वरील नवीन आणि सर्वोत्कृष्ट भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संगीत जाहिरातींशिवाय मुक्तपणे ऐकण्यासाठी, बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय व्हिडिओ पाहण्यासाठी, सर्वात जास्त आवडणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी, त्यांची शिपिंग जलद व मोफत मिळवण्यासाठी ही मोठी संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link