Next
नंदिनी आत्मसिद्ध, चंद्रकांत बावडेकर
BOI
Wednesday, December 20 | 04:00 AM
15 0 0
Share this story

महिलांविषयीच्या प्रश्नांवर पोटतिडकीने लिहिणाऱ्या प्रसिद्ध पत्रकार नंदिनी आत्मसिद्ध आणि लेखक चंद्रकांत बावडेकर यांचा २० डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
........
नंदिनी आत्मसिद्ध 
२० डिसेंबर १९५७ रोजी जन्मलेल्या नंदिनी आत्मसिद्ध या प्रसिद्ध लेखिका आणि पत्रकार म्हणून ओळखल्या जातात. सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो. संस्कृत घेऊन एमए करत असताना त्यांना जगन्नाथ शंकरशेट पुरस्कार मिळाला होता. 

विविध सामाजिक विषयांवर त्यांनी पुष्कळ लेखन केलं आहे. महिला हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. महिलांविषयीच्या प्रश्नांवर त्यांनी पोटतिडकीने लिहिलं आहे. त्यांचा हिंदी, उर्दू आणि बंगाली साहित्याचा अभ्यास आहे. कविता आणि कथांच्या अनुवादाबरोबर त्यांनी ललित लेखनही केलेलं आहे.
 
कोरा कागद... निळी शाई, विदेशिनी, गीतकार, कारेनामा, कथालोक, ओळख, अपूर्व बंगाल, रूपेरी गीतगुंजन यांसारखी त्यांची पुस्तकं गाजलेली आहेत. 
............

चंद्रकांत विष्णू बावडेकर

२० डिसेंबर १९०६ रोजी जन्मलेले चंद्रकांत विष्णू बावडेकर हे मुंबई मराठी साहित्य संघाचे पंधरा वर्षं कार्यवाह राहिलेले लेखक! 

आपले अन्न, पाच वर्षांचा पाहुणा, लाल किल्ला, जॉन केनेडी, सरहद्दीवरील साहसे, हम्फ्री असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१९ जानेवारी १९७६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link