Next
मुंबई येथे चौथा स्तंभ राजस्तरीय पुरस्कारांचे वितरण
BOI
Tuesday, April 02, 2019 | 11:21 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व अप्रतिम मीडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण नुकतेच करण्यात आले.

पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांना चौथा स्तंभ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. दोन महिन्यांपूर्वी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. यात विविध गटातून राज्यातील पत्रकारांना हा पुरस्कार दिला गेला. औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रशिक्षण सभागृहात नुकताच हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची माहिती संयोजक डॉ. अनिल फळे यांनी दिली.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामकृष्ण मिशनचे विश्वस्त विष्णुपादानंद महाराज, माजी महसुल आयुक्त डॉ. कृष्णा भोगे, जेष्ठ उद्योजक राम भोगले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. दिनकर माने, जेष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे, दिलासा प्रतिष्ठानच्या डॉ. अनघा पाटील, शाश्वत विकासच्या तज्ज्ञ वैशाली खाडीलकर आदी उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातील पत्रकारिता विभागात शिक्षण घेणारे शुभम रेखा शंकर पेडामकर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना बेसिक पत्रकारिता शिकवण्याचे काम नि:स्वार्थी भावनेने करत आहेत. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. ‘गाव माझा चॅनल’ वाहिनीवर वृत्तनिवेदन करणाऱ्या प्रियांका धारवाले यांनादेखील या प्रसंगी सन्मानित करण्यात आले. या दोघांवरही सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search