Next
पुण्यात पौराणिक विवाह परंपरेवर नृत्यरचनेचे सादरीकरण
प्रेस रिलीज
Monday, April 29, 2019 | 01:21 PM
15 0 0
Share this article:

संग्रहित फोटो

पुणे : ‘भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘दिव्य विवाहम्’ या पौराणिक विवाह परंपरेवर आधारित नृत्यरचना सादरीकरणाचे आयोजन तीन मे २०१९ करण्यात आले आहे,’ अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.

कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. उषा आर. के. यांच्या वतीने हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. तीन मे रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात हा कार्यक्रम होईल. यात अरुंधती पटवर्धन, परिमल फडके (पुणे), प्राची सावे, आनंद सच्चीदानंदन, पवित्रा भट, अपर्णा आणि निधग करुनाड (मुंबई), रसिका किरण, आदित्य पी.व्ही., आदिती सदाशिवा, मिथुन श्याम (बंगळुरू), श्रेयसी गोपीनाथ (दिल्ली) हे कलाकार सहभागी होणार आहेत.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा हा ७६वा कार्यक्रम असून, तो विनामूल्य आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search