Next
मकरंद अनासपुरे ‘टीव्हीएस एक्सएल’चे ब्रँड अॅम्बेसेडर
प्रेस रिलीज
Thursday, September 20, 2018 | 02:16 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : टीव्हीएस मोटर कंपनीने अभिनेते मकरंद अनासपुरे यांची ‘टीव्हीएस एक्सएल १००’ श्रेणीचे महाराष्ट्रातील ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. 

‘टीव्हीएस एक्सएल १००’ हा देशातील एक प्रसिद्ध ब्रँड असून, अत्याधुनिकतेमुळे तो देशभरात प्रवासासाठी अतिशय सोयीस्कर म्हणून ओळखला जातो. या सहकार्याद्वारे ब्रँडने महाराष्ट्रातील ग्राहकांप्रती आपली बांधिलकी अधिक दृढ केली असून, आपले स्थानही आणखी बळकट केले आहे.

या नव्या ब्रँड सहकार्याविषयी मकरंद अनासपुरे म्हणाले, ‘टीव्हीएएस एक्सएल ब्रँडने देशभरात दिलेले योगदान पाहातच मी मोठा झालो आहे आणि त्यांच्या अत्याधुनिक अशा ‘टीव्हीएएस एक्सएल १००’शी जोडताना मला अतिशय आनंद होत आहे. हा ब्रँड माझ्याइतकाच महाराष्ट्रात खोलवर रूजलेला आहे. टीव्हीएस मोटर कंपनी ही प्रतिष्ठित कंपनी असून, विविध उत्पादनांच्या वारशासह कंपनी अत्युच्च दर्जा आणि खात्रीशीर ग्राहक समाधान देते. ब्रँडसोबतची ही भागिदारी समृद्ध करण्यासाठी मी उत्सुक आहे.’

‘टीव्हीएएस एक्सएल १००’ श्रेणीमध्ये ‘टीव्हीएएस एक्सएल १००’, ‘टीव्हीएएस एक्सएल १०० हेवी ड्युटी’ आणि नुकतेच सादर केलेले ‘टीव्हीएएस एक्सएल १०० हेवी ड्युटी आय टच स्टार्ट’ या तीन वाहनांचा समावेश होतो. या गाडीमध्ये आय- टच स्टार्ट या इलेक्ट्रिक स्टार्ट तंत्रज्ञानाचे स्टार्टर जनरेटर यंत्रणेसह एकत्रीकरण करण्यात आले आहे. ‘टीव्हीएएस एक्सएल १००’ची पूर्ण श्रेणी वाजवी किंमत, आरामदायीपणा आणि बहुपयोगीपणासाठी प्रसिद्ध आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search