Next
‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश
देशपातळीवरील अभियांत्रिकी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
प्रेस रिलीज
Monday, February 18, 2019 | 05:25 PM
15 0 0
Share this article:

बेंगलुरू येथे झालेल्या ‘इमटेक्स २०१९’ या कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारताना ‘डीकेटीई’चे विद्यार्थी व प्राध्यापक.

इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षांत शिकत असलेल्या पाच विद्यार्थ्यांनी बेंगलोर येथे ‘इमटेक्स २०१९’ या जागतिक स्तरावरील अत्याधुनिक मशिनरी टूल्सच्या प्रदर्शनात आयोजित केलेल्या प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे.

या स्पर्धेत देशभरातील ५०हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ३००हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ‘डीकेटीई’तील तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये शिकणाऱ्या अपूर्व कुलकर्णी, शंतनू काकडे, चिन्मय चौगुले, प्रथमेश उरुणकर व चेतन नांद्रे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून प्रथम पारितोषिक पटकाविले. अत्याधुनिक मशीन तंत्रज्ञान याबद्दलचे विद्यार्थ्यांना आकलन होण्यासाठी व त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली होती. यात आयोजकांकडून ‘उत्पादन तंत्रज्ञान प्रश्‍नमंजुषा’ ही स्पर्धा घेण्यात आली.
 
इंडियन मशीन टूल्स मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशन (इमटेक्स) यांच्या विद्यमाने जागतिक स्तरावरील अत्याधुनिक मशीनरी टूल्सचे प्रदर्शन बेंगलुरू येथे भरवण्यात आले होते.  जगभरातील सुमारे एक हजारांहून अधिक अत्याधुनिक अ‍ॅटोमॅटीक मशिनरी मॅन्युफॅक्चरर नामांकित कंपन्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत एकूण तीन फेऱ्या होत्या. प्रत्येक फेरीमध्ये विचारल्या जाणाऱ्या तांत्रिक प्रश्‍नांमध्ये ‘डीकेटीई’चे विद्यार्थी गुणवत्ता सिद्ध करीत होते. यामध्ये बौद्धिक, तांत्रिक, अत्याधुनिक तंत्रज्ञान, जनरल नॉलेज व मुल्यांकन या सर्व स्तरावर ‘डीकेटीई’चे विद्यार्थी पात्र ठरले आणि त्यांना प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, खजिनदार आर. व्ही. केतकर, सचिव डॉ. सपना आवाडे, संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. डॉ. व्ही. आर. नाईक यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मेकॅनिकल विभागामध्ये कार्यरत असलेले प्रा. जी. सी. मेकळके यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search