Next
बस प्रवासातही मिळणार दर्जेदार खाद्यपदार्थ
पुणे-मुंबई प्रवाशांसाठी ‘प्रसन्न पर्पल’ची सुविधा
प्रेस रिलीज
Thursday, April 25, 2019 | 03:56 PM
15 0 0
Share this article:


पुणे : विमान प्रवास करताना बसल्याजागी उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ मिळतात तोच दर्जा आता पुणे-मुंबई बस प्रवासात मिळणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध ‘प्रसन्न पर्पल’ या लक्झरी बस सेवा देणाऱ्या संस्थेने भारतात प्रथमच अशी सुविधा सुरू केली आहे.

पुणे-मुंबई बस प्रवासात अनेक प्रवासी हे मुंबईला कामानिमित्त जात असतात. त्यामुळे अधे-मध्ये बस थांबवून फूड मॉलवर जाणारा वेळ वाचवा व लवकरात लवकर पोहोचावे अशी मागणी प्रवाशांकडून होते. त्याचाच विचार करत अशी सुविधा पुरविण्याचा निश्चय करून त्याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणीही सुरू केली आहे. यासाठी प्रवाशांनी तिकीट बुक करतानाच त्यांना एसएमएसद्वारा एक लिंक पाठवण्यात येते. त्यावर गेल्यावर वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची यादीच समोर येते. त्यानुसार आपल्याला हवा तो पदार्थ निवडता येतो. हे सारे पदार्थ शुद्ध शाकाहारी असणार असून, खास ‘शेफ’कडून मार्गदर्शन केलेले आहेत.

आपल्या या नव्या प्रकल्पाविषयी प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न पटवर्धन म्हणाले, ‘हा प्रकल्प आमच्यासाठीही प्रायोगिक आहे. ‘ऑन दी गो’च्या सहकार्याने आम्ही ही सेवा सुरू केली आहे. हे खाद्यपदार्थ बनविण्यासाठी वाकड येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्वयंपाक घर बनविले आहे. आरोग्याची आणि स्वच्छतेचीही पूर्ण काळजी घेतली जात असून, हवा बंद डब्यातच हे खाद्यपदार्थ देण्यात येत आहेत. शिवाय यातून होणारा कचराही आमचे कर्मचारी गोळा करून त्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्याचीही व्यवस्था आम्ही केली आहे. प्रवाशांची सुविधा हाच आमचा मुख्य हेतू असल्याने हा प्रकल्प राबवत आहोत. याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन त्याची व्याप्ती वाढविण्यात येईल.’

‘ऑन दी गो’ संस्थेच्या व इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष डॉ. तारिता शंकर म्हणाल्या, ‘प्रवाशांना आरोग्यपूर्ण आणि चविष्ठ अन्न मिळावे हे आधीपासूनच माझ्या मनात होते. आमचे स्वच्छ व नीटनेटके स्वयंपाकघर महामार्गावर असल्याने आम्ही प्रवाशांना गरम आणि पौष्टिक पदार्थ देऊ शकतो. या प्रकल्पामुळे पर्पल ग्रुप सोबतचे आमचे अनेक वर्षांचे संबंध आम्ही एक पूल अजून पुढे नेत आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search