Next
‘होंडा’तर्फे सीबीआर, सीबी हॉर्नेटची नवी आवृत्ती दाखल
प्रेस रिलीज
Monday, April 02, 2018 | 02:38 PM
15 0 0
Share this story

होंडा सीबीआर २५०आरगुरुग्राम (हरियाणा) : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने सीबीआर २५०आर आणि सीबी हॉर्नेट १६०आर या स्पोर्ट्स उत्पादनांच्या २०१८ आवृत्तीची उपलब्धता व किंमत जाहीर केली. तरुणांना आकृष्ट करतील, अशा अनेक नव्या गोष्टी सीबीआर २५०आर, सीबी हॉर्नेट ‘१६०आर’मध्ये समाविष्ट केल्या आहेत.

२०१८ आवृत्तीमध्ये, ‘सीबीआर २५०आर’मध्ये टू-चॅनेल एबीएस (अँटि-लॉक ब्रेकिंग सिस्टीम) व वाय आकारासारखे दिसणारे एलईडी हेडलँप असलेली नवी आकर्षक स्पोर्टी स्टाइल समाविष्ट केली आहे.

२०१८ सीबी हॉर्नेट १६०आर आता एबीएस, एलईडी हेडलँप व आक्रमक रूप अशा थाटात उपलब्ध आहे. कमी देखभाल गरजेची असलेल्या सील चेनमुळे ‘सीबी हॉर्नेट १६०आर’च्या सर्व्हिससाठी येणारा खर्च कमी होतो. वहझार्ड लाइट स्वीचमुळे एकाच वेळी सर्व इंडिकेटर लागत असल्याने सुरक्षेची काळजी घेतली जाते.

मोटरसायकल पाठवण्यास सुरुवात करण्याबद्दल, ‘होंडा’च्या सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘सीबीआर २५०आर आणि सीबी हॉर्नेट १६०आर यांच्या २०१८ आवृत्तीमध्ये नव्या गोष्टी समाविष्ट केल्या आहेत. या दोन्ही स्पोर्टी मोटरसायकल म्हणजे अँटि-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस) असलेल्या होंडाच्या पहिल्या मेनस्ट्रीम बाइक आहेत. मोटरसायकलमध्ये एलईडी बसवण्याचे आश्वासन पूर्ण करत, सीबीआर २५०आर आणि सीबी हॉर्नेट १६०आर यामध्ये एलईडी हेडलँप बसवले आहेत. इतकेच नाही, तर ‘होंडा’ने तरुण बाइकप्रेमींसाटी आक्रमक व स्पोर्टी स्टाइल आणखी दृढ केली आहे.’

‘सीबीआर २५०आर’ची २०१८ आवृत्ती

सीबीआर ‘२५०आर’च्या २०१८ आवृत्तीमध्ये टू-चॅनेल एबीएस, पूर्णतः एलईडी हेडलँप व प्रत्येक बाजूला पोझिशन लँप आहे. रेसिंगचे वैशिष्ट्य कायम ठेवून सीबीआर २५०आर आता नव्यारूपात दाखल झाली असून, याचे श्रेय ९०च्या दशकातील मूळ फायरब्लेडपासून प्रेरित असलेल्या आक्रमक ग्राफिकला जाते. सीबीआर २५०आर सध्याच्या स्पोर्ट्स रेडशिवाय मॅट अॅक्सिसग्रे मेटॅलिक व मार्स,  ऑरेंज-मॅट अॅक्सिसग्रे मेटॅलिक व स्ट्रायकिंग ग्रीन-पर्ल स्पोर्ट्स यलो या तीन नव्या स्पोर्टी रंगांमध्ये मिळेल.

मोटरसायकल सहज हाताळता यावी व आरामात वापरता यावी म्हणून सीबीआर २५०आर चालवण्याची स्थिती ताणमुक्त स्पोर्ट्स रायडिंग पोझिशन अशी आहे. इंजिनाच्या प्रत्येक वेगाला सुरळीत टॉर्क व शक्तिशाली २४९.६०सीसी डीओएचसी इंजिनामुळे ही मोटरसायकल चालवणाऱ्याला रेसर असल्यासारखे वाटते. सीबीआर ‘२५०आर’चे स्टँडर्ड आणि एबीएस हे दोन प्रकार असून, त्यांची किंमत एक लाख ६३ हजार ५८४ रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

होंडाची १६०सीसी स्ट्रीट फाइटर- सीबी हॉर्नेट १६०आर
होंडा सीबी हॉर्नेट १६०आरपेटल डिस्कला एबीएस पूरक ठरत असल्याने सीबी हॉर्नेट १६०आर अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. हॉर्नेट’ असलेले ठाशीव, आकर्षक ग्राफिक इंधनटाकीची शोभा वाढवते आणि पूर्णतः डिजिटल मीटरमध्ये नवा बॅकलाइट बसवला आहे. नवा हझार्ट लाइट स्वीच व लो मेंटेनन्ससील चेन यामुळे मोटरसायकल चालवणे अधिक सोयीचे ठरले आहे.

होंडाच्या आधुनिक स्पोर्ट्स मोटरसायकल सीबी हॉर्नेट ‘१६०आर’मध्ये १६०सीसी HET हे विश्वासार्ह इंजिन बसवले आहे. भारतातील तरुणांची मोटरसायकलच्या कामगिरीविषयीची अपेक्षा लक्षात घेत, हे इंजिन इंधनक्षमतेमध्ये कोणतीही तडजोड न करता मोटरसायकलला बळ देणार आहे. २०१८ आवृत्ती नव्या डॅझल यलो मेटॅलिक रंगामध्ये अॅथलेटिकब्लू मेटॅलिक, स्ट्रायकिंग ग्रीन, मार्सऑरेंज आणि स्पोर्ट्स रेड या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.

उत्तम मूल्य समाविष्ट करत, सीबी हॉर्नेट १६०आर आता स्टँडर्ड (फ्रंट डिस्क, रिअर ड्रम), सीबीएस (फ्रंट व रिअर डिस्क), एबीएस स्टँडर्ड (फ्रंट डिस्क, रिअर ड्रम) आणि एबीएस डिलक्स (फ्रंट व रिअर डिस्क) या चार प्रकारांत असून, २०१८ आवृत्तीची किंमत ८४ हजार ६७५ रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link