Next
‘शासकीय योजना पोहोचवण्यासाठी लोककला सर्वांत प्रभावी माध्यम’
BOI
Saturday, September 08, 2018 | 06:02 PM
15 0 0
Share this article:



सोलापूर :
शासनाच्या योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी लोककला आणि लोककलावंत प्रभावी भूमिका बजावू शकतात. लोककलावंत हे शासन आणि जनता यांमधील संवादसेतू आहेत, असे मत विविध वक्त्यांनी मांडले. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने सोलापुरात शुक्रवारी (सात सप्टेंबर २०१८) स्वच्छ भारत मिशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी हे मत मांडण्यात आले. 

क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्या उपस्थितीत झाले.

आमदार शिंदे म्हणाल्या, ‘आपल्या देशातील बहुसंख्य लोक अद्याप ग्रामीण भागात राहतात. त्यांचे प्रबोधन करायचे असेल, तर त्यांच्या भाषेत समजावून सांगितले पाहिजे. हे काम कोणत्याही माध्यमापेक्षा लोककलावंत चांगल्या प्रकारे करु शकतात. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कलावंतांनी चांगली जाणीव, जागृती केली आहे.’ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड म्हणाले, ‘लोककलावंत लोकांना त्यांच्या भाषेत सांगतात. त्यामुळे लोकांना कलावंतांबाबत आपलेपणा वाटतो. त्यामुळे कलावंत प्रभावी जनजागृती करू शकतात. लोककलावंत लोकांच्या वागण्यात बदल घडवून आणू शकतात. त्यांना प्रेरित करू शकतात.’

उपायुक्त ढेंगळे-पाटील म्हणाले, ‘कलावंतांनी यापूर्वी  शासनाच्या विविध योजना यशस्वी करण्यासाठी खूप चांगले योगदान दिले आहे. स्वच्छ भारत अभियानातही कलावंतांनी चांगले काम करावे.’

या वेळी नेहरू युवा केंद्राचे प्रमोद हिंगे, जिल्हा माहिती  अधिकारी रवींद्र राऊत, क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने, माधव जायभाये, प्रशासन अधिकारी सुनील डहाके आदी उपस्थित होते. क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी प्रास्ताविक, तर पराग मांदळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेत राज्यात विविध जिल्ह्यांत काम करणाऱ्या कलापथकांचे प्रमुख आणि कलाकार सहभागी झाले होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search