Next
‘लक्ष्मीकांत आणि अभिनय यांची अभिनयशैली वेगळी’
सचिन पिळगावकर यांचे मत
BOI
Saturday, March 02, 2019 | 03:28 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनय बेर्डे यांच्यात अनेक गोष्टींचे साम्य असले तरी दोघांची अभिनयाची शैली मात्र  वेगळी आहे,’ असे अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी नमूद केले. 

‘अशी ही आशिकी’ या सचिन पिळगावकर दिग्दर्शित चित्रपटात अभिनय बेर्डे याने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी पुण्यात आलेल्या अभिनय बेर्डे, हेमल इंगळे आणि सचिन पिळगावकर यांनी ‘रेमंड’च्या दालनाला भेट दिली. या वेळी  उपस्थितांशी संवाद साधला. यात अभिनय बेर्डे याचा कपडेपट ‘रेमंड’ने तयार केला आहे. 

सचिन पुढे म्हणाले, ‘लक्ष्मीकांतची शैली विनोदाकडे झुकणारी होती. त्याची विनोदबुद्धी, अचूक टायमिंग हे वेगळेच होते. त्याच्या स्वभावातून ते आले होते. अभिनयची शैली थोडी वेगळी आहे;मात्र तोही आपल्या वडिलांप्रमाणे अत्यंत टॅलेंटेड अभिनेता आहे. लक्ष्मीकांत आपल्या कामाप्रती अत्यंत निष्ठावान होता. तीच निष्ठा अभिनयमध्ये दिसते.’  

‘अशी ही आशिकी’ हा माझा सचिन सरांबरोबरचा पहिला चित्रपट. त्यांच्याबरोबर काम करण्याचे माझे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. माझा पहिला चित्रपट ‘ती सध्या काय करते’ प्रदर्शित झाल्यानंतर मी आईला विचारले होते, मला सचिन पिळगावकर यांच्याबरोबर काम करायचे आहे, मिळेल का अशी संधी, त्या वेळी आई म्हणाली होती, तुझ्यात क्षमता असेल आणि नशिबात असेल तर नक्की तुला सचिन त्यांच्या चित्रपटात भूमिका देतील. आणि खरेच तसे झाले. मला दुसराच चित्रपट सचिन सरांसोबत करायला मिळाला. ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे,’ अशी भावना अभिनय बेर्डे याने व्यक्त केली. 

या वेळी सचिन पिळगावकर यांनी नवोदित अभिनेत्री हेमल इंगळे आणि अभिनय बेर्डे यांच्या कामाचे कौतुक केले. 

‘या चित्रपटासाठी निवड होणे आणि सचिन सरांसोबत काम करायला मिळणे हा खूप मोठा अनुभव होता. त्यांचे आशीर्वाद आपल्याबरोबर आहेत, ही बाब मला खूप आत्मविश्वास देते,’ असे हेमल इंगळे हिने सांगितले.

(अशी ही आशिकी या चित्रपटाच्या निमित्ताने सचिन पिळगावकर, अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे यांच्याशी साधलेल्या संवादाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search