Next
आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनतर्फे स्पर्धांचे बक्षीस वितरण
BOI
Saturday, January 19, 2019 | 03:22 PM
15 0 0
Share this article:मुंबई : येथील आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनतर्फे विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या गावस्कर सभागृहात करण्यात आले.

या वेळी प्रश्न मंजूषा, महिला, एलजीबीटी आणि इतर अर्थाने सक्षम, समाजासोबत सेल्फी, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, डॉ. बी. आर. आंबेडकर लिखित ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ या पुस्तकावर आधारित परीक्षा, स्वरचित काव्यवाचन स्पर्धा, पोवाडा, क्रांतीगीत गायन स्पर्धा, नारायण मेघाजी लोखंडे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार अशा विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. रोहित वेमुला याच्या स्मृतिदिनानिमित्त त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

स्पर्धांचा सविस्तर निकाल अनुक्रमे (प्रथम, द्वितीय, तृतीय) असा : प्रश्नमंजुषा- अस्मिता कटारे, जोहा खान, तेजल सावरकर, सुवर्णा जाधव (उत्तेजनार्थ). समाजासोबत सेल्फी- आनंदराज घाडगे, एकनाथ गोपाळ, आकेश मोरे, विजिता राजन (उत्तेजनार्थ). वक्तृत्व स्पर्धा- सुप्रिम मस्कर, आकाश पाटील, लक्ष्मण कचरे, उत्तेजनार्थ प्राची भगत, मृणाल सापळे, प्रथमेश्वर उंबरे, तेजस पारपोलकर, अक्षय इळके.

निबंध स्पर्धा- मयुर दंडाळे, शैलेश कोंडसकर, सतीश कांबळे. मोतिलाल पावरा (उत्तेजनार्थ). जातीभेदाचे निर्मूलन स्पर्धा- निखील अडसुळे, उम्मे हानी खान, स्वप्नील सकपाळ, अलिशा कांबळे (उत्तेजनार्थ). कवितावाचन स्पर्धा- उद्देश पवार, शेखर चोरघे, सुजित काळंगे, उत्तेजनार्थ भाऊसाहेब सोनावणे, प्रवीण खरे, पल्लवी सूर्यवंशी, निखील बेलोटे, प्रतीक्षा काटे, अक्षता परकांडे, शफक खान, पद्मजा वडाळकर, तुषार मांडवकर, जयेश शिंदे. पोवाडा स्पर्धा- विनोद गोडबोले, सुबोध सुर्वे, श्रुती खैरे, प्रमोद येलवे (उत्तेजनार्थ).

शुभम पेडामकर, कुणाल रामटेके, मिलिंद जाधव यांना नारायण मेघाजी लोखंडे उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या स्पर्धांना संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कार्यात आर्थिकदृष्ट्या हातभार लागावा म्हणून त्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी राजकुमार मोरे, मुख्याध्यापिका कविता भोसले, दिलीप रणदिवे प्रमुख म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमातून, विविध स्पर्धांच्या माध्यमातून तुम्ही ऊर्जा घेऊन जात आहात हजारो रोहित वेमुला रस्त्यावर लढण्यासाठी उतरले आहेत. लिहायला, बोलायला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार मांडण्यासाठी आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन हा विचारमंच नेहमीच उपलब्ध आहे, असे या वेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष सचिन मनवाडकर यांनी मांडले. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष शिवराज कांबळे, सचिव बुद्धभूषण कांबळे, सुदर्शन कुलाबकर, अक्षय कांबळे, संदीप कांबळे, नितीन कांबळे, एकनाथ गोपाळ, आनंदराज घाडगे, सुयश कांबळे, विशाल वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयश कांबळे याने केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search