Next
या चिमण्यांनो... परत फिरा रे
BOI
Tuesday, March 20, 2018 | 03:18 PM
15 0 0
Share this story

फोटो : मोहन काळे

आज २० मार्च, अर्थात जागतिक चिमणी दिन. मानवी वस्तीजवळ राहणाऱ्या चिमण्यांची संख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने घटू लागली आहे. त्याबद्दल जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. त्या निमित्ताने... 
.......
अगदी लहान असल्यापासून माणसाला ज्या प्राणी-पक्ष्यांची ओळख करून दिली जाते, त्यात चिऊताईचा क्रमांक सगळ्यात वरचा असतो. चिमणीचे माणसाशी असलेले नाते जवळपास १० हजार वर्षे जुने आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अशी ही आपल्या अंगणात नाचणारी, घरांच्या अवतीभवती उडणारी अन् चिवचिवाट करणारी चिऊताई आज बेघर झाली आहे. गोष्टीतील चिमणीचे घर मेणाचे असल्याने ते वाहून जात नाही आणि चिमणी बेघर होत नाही; पण आज प्रत्यक्षात मात्र चिमण्या बेघर होऊ लागल्या आहेत आणि त्यांची संख्याही झपाट्याने कमी होऊ लागली आहे. वेगाने होणारे शहरीकरण हे त्याचे मुख्य कारण असून, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी २०१०पासून दर वर्षी २० मार्च रोजी वर्ल्ड स्पॅरो डे अर्थात जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो.

गेल्या काही वर्षांत आशियाई देशांत चिमण्यांची संख्या घटू लागली असून, भारतात त्याचे प्रमाण अधिक आहे. याबद्दल जागृतीसाठी दिल्लीने २०१२मध्ये चिमणीला राज्यपक्षी म्हणून घोषित केले आहे. काही भागांत जागृती वाढल्यामुळे त्यांच्या पक्ष्यांसाठी, तसेच खास करून चिमण्यांसाठीही अन्न-पाण्याची व्यवस्था केली जात आहे. 

माणसासाठी होत असलेला विकास पशुपक्ष्यांचे जीवन भकास करत चालला आहे. जीवनशैलीतील बदलामुळे जागतिक तापमानवाढीचा फटका बसू लागला आहे. चिमण्यांची संख्या कमी होण्याचे तेही एक कारण आहे. सिमेंटची जंगले, मोबाइल टॉवर, वाहनांची गर्दी, त्यामुळे होणारे प्रदूषण अशा कारणांमुळे पक्ष्यांची आणि विशेषतः चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. कारण या चिमण्या मानवी वस्तीतच वास्तव्याला असतात. या चिमण्यांना इंग्रजीत हाउस स्पॅरो असे म्हणतात, तर Passer domasticus हे त्यांचे शास्त्रीय नाव आहे. पॅसर म्हणजे झाडांच्या फांद्यांवर बसून गाणारा छोटा पक्षी. डोमेस्टिकस म्हणजे पाळीव, घरगुती, घरोब्याचे! यावरूनच त्यांचे माणसाशी असलेले संबंध स्पष्ट होतात.  

चिमण्यांची संख्या घटल्याने ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे..’ अशी साद घालायची वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे. त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले, तर त्यांची घटलेली संख्या नक्की वाढेल, असे शास्त्रज्ञांना वाटते. मानवी वस्तीमध्ये शक्य तेथे वृक्षारोपण, तसेच कृत्रिम घरटी आणि मातीच्या भांड्यात पाण्याची व्यवस्था, घराच्या अंगणात व गच्चीवर दररोज पसाभर धान्य पसरवून टाकणे, अशा उपाययोजना केल्या, तर चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा अनुभवायला मिळू शकेल, असा विश्वास अकलूज येथील पक्षितज्ज्ञ डॉ. अरविंद कुंभार यांनी व्यक्त केला.

चिमण्यांना पाणी पिण्यासाठी अशी मातीची भांडी ठेवता येऊ शकतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Amit Suresh Salunke About 14 Hours ago
Thanks for your help and support Very nice information
0
0
अरविंद कुंभार About
प्रत्येकांनी आपल्या लहान मुले व नातंवडांना चिमण्यांसाठी उपयुक्त व पोषक वाटणारे उपयोजना बदल माहिती देऊन त्यांना उद्युक्त केले तर नक्की चिमण्या मानवी वसाहतीत परततील. ...
0
0
पांडुरंग गवळी About
चिमन्यांबद्दलची खूप छान माहिती मिळाली . छायाचित्रेही बोलकी आहेत . बाईट्स ऑफ इंडिया टिमचे अभिनंदन !
0
0

Select Language
Share Link