Next
‘एनएफएआय’मध्ये चित्रपट जतनासाठी नव्या सुविधा लवकरच
माहिती आणि प्रसारणमंत्री जावडेकर यांची माहिती
BOI
Monday, July 01, 2019 | 05:43 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘नॅशनल फिल्म अर्काइव्ह (एनएफएआय) अर्थात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील दुर्मीळ चित्रपटांच्या रिळांचे जतन करण्यासाठी ‘एनएफएआय’च्या कोथरूड येथील तीन एकर जागेत व्हॉल्ट बांधण्यात येतील. यासंबंधीचा प्रकल्प आराखडा तयार झाला आहे,’ अशी माहिती केंद्रिय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात दिली. 

जावडेकर यांनी रविवारी ‘एनएफएआय’ येथे तेथील कामकाजासंबंधीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जावडेकर म्हणाले, ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन हा सहाशे कोटी रूपयांचा प्रकल्प मोदी सरकारने मागील पाच वर्षापूर्वी घोषित केला. त्याअंतर्गत ‘एनएफएआय’ येथील जुन्या आणि नव्या तसेच दुर्मीळ चित्रपटांच्या रिळांचे जतन; तसेच डिजिटायझेशन करण्यात येईल. ‘एनएफएआय’मध्ये आजमितीला एक लाख ३२ हजार फिल्म्स म्हणजे चित्रपटांची रिळे आहेत. त्यांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यांची दुरुस्ती आणि डिजिटायझेशन लवकरच सुरू होईल. ‘एनएफएआय’मध्ये वीस हजारांहून अधिक सिनेमांच्या गीतांच्या पुस्तिका आहेत, तर तीस हजारांहून अधिक जुनी चित्रपटांची दुर्मीळ पोस्टर्स आहेत. चाळीस हजार जुन्या स्क्रिप्ट्स म्हणजे चित्रपटांच्या संहिता आहेत. त्याचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. कारण हा भारतीय चित्रपट संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे,’ असेही जावडेकर यांनी सांगितले.


‘एनएफएआयमधील जयकर बंगल्याचेही नुतनीकरण पूर्ण झाले असून, पुढील महिन्यात त्याचे उद्घाटन होईल. तेथे डिजिटल लायब्ररीदेखील सुरू करत असून, त्याचा संशोधकांना लाभ होईल; तसेच लहान मुलांसाठी चिल्ड्रन फिल्म क्लबही सुरू करण्यात येणार आहे,’ असेही जावडेकर यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search