Next
महापरिवर्तन उपक्रमासाठी नॅसकॉमचे सहकार्य
जळगाव, बुलढाणा जिल्ह्यात चार डिजिटल साक्षरता केंद्रे
प्रेस रिलीज
Wednesday, October 24, 2018 | 01:42 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महापरिवर्तन उपक्रमासाठी एचपीई आणि नॅसकॉम यांनी भागीदारी केली असून, त्यांच्यावतीने जळगाव व बुलढाणा जिल्ह्यांतील ग्रामीण भागांमधील महिला बचत गटांसाठी चार नवीन डिजिटल साक्षरता केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. 

 महाराष्ट्राच्या सामाजिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या महापरिवर्तन या उपक्रमात सार्वजनिक-खासगी भागीदारीचा उपयोग करून घेण्यावर भर देण्यात येतो. महापरिवर्तन उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांसाठी नॅसकॉम फाउंडेशन हे औद्योगिक भागीदार आहेत. एचपीईच्या भागीदारीने फाउंडेशनतर्फे जळगाव आणि बुलढाणा येथील निवडक ठिकाणी शिपिंग कंटेनर्समध्ये प्रशिक्षण वर्ग उभारण्यात येणार आहेत. या वर्गांमध्ये खिडक्या, टेबल, कॉम्प्युटर, इंटरनेट, वातानुकूलित यंत्रणा, रेफ्रिजरेटर्स इत्यादी सुविधा असतील. माविम (महिला आर्थिक विकास महामंडळ) आणि एमएसआरएलएम (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) यांच्या उपक्रमांसाठी संबंधित महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्यासाठी या कंटेनर्सचा वापर करण्यात येईल. कृषी विकास (बुलढाणा) आणि संस्कृती संवर्धन मंडळ (जळगाव) या संस्थांची अंमलबजावणी भागीदार म्हणून निवड करण्यात आली आहे. या संस्था महिला बचत गटांना डिजिटल साक्षरता आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन टूल्सबद्दल (डिजिटल व्यवहार साधने) प्रशिक्षण देणार आहेत. 

महिला बचत गटांद्वारे तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांची स्थानिक पातळीवर, आजुबाजूच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये त्यांची विक्री करण्यात येते. त्याचप्रमाणे डिजिटल व ऑफलाइन मार्गांचा वापर करून बाजारपेठेशी जोडणी विकसित करण्याबद्दल आणि त्यात सुधारणा करण्याबद्दलही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे बचत गटांचे सबलीकरण होईल आणि त्यांच्या स्थानिक व्यवसायांसाठी विविध संधी उपलब्ध होतील, अशी आशा एचपीई आणि नॅसकॉमला आहे. 

‘प्रशिक्षण घेतल्यानंतर लाभार्थी ईमेल पाठवू शकतील, सोशल मीडियावरून जोडले जाऊ शकतील, ई-कॉमर्स वेबासाइटवरून खरेदी करू शकतील, ऑनलाइन बिले भरू शकतील, डिजिटल पेमेंट माध्यमांचा वापर करून व्यवहार करू शकतील, नकाशांचा वापर करू शकतील, हवामानाचा अंदाज घेऊ शकतील आणि आधार कार्ड, शिधावाटप पत्रिका, पॅन कार्ड आणि इतर सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी इंटरनेट वापरू शकतील. आपल्या आर्थिक स्रोतांबद्दल माहितीपूर्ण आणि परिणामकारक निर्णय घेऊ शकतील, बाजारपेठांशी जोडले जाऊन आपले उद्योजकता कौशल्य वापरून आपली उत्पादने अधिक चांगल्या किमतीला विकू शकतील.आपल्या आजुबाजूच्या जगाशी जोडण्याच्या प्रत्येक घटकावर डिजिटल परिवर्तनाचा प्रभाव असतो. त्यामुळे डिजिटल साक्षरता हे आपल्या नागरिकांसाठी महत्त्वाचे कौशल्य आहे’, असे एचपीई इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सोम सत्संगी म्हणाले. 

‘नासकॉम फाउंडेशनच्या भागीदारीने या डिजिटल वर्गांची सुरुवात हे महाराष्ट्र शासनाच्या महापरिवर्तन उपक्रमाला आम्ही दिलेल्या पाठींब्याचे द्योतक आहे. आमच्या फ्युचर क्लासरूम कार्यक्रमासह ही डिजिटल साक्षरता केंद्रे स्थानिक महिला बचत गटांना महत्त्वाच्या कौशल्यांबाबत प्रशिक्षण देतील. या कौशल्यांचा वापर करून या महिला देशाच्या आर्थिक विकासात सक्रियपणे सहभागी होऊ शकतील. दीर्घकालीन, डायनामिक आणि एकात्मिक व्यासपीठ असलेल्या प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान या डिजिटल जागरुकता, प्रशिक्षण आणि क्षमता विकास कार्यक्रमाच्या डिजिटल साक्षरता आवश्यकतांची पूर्तता या प्रयत्नांमुळे होईल. या माध्यमातून ग्रामीण समाज जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये पूर्णपणे सहभागी होऊ शकेल’, असे ही त्यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search