Next
‘ग्योथं इन्स्टिट्यूट’तर्फे पर्यावरणविषयक प्रदर्शन
प्रेस रिलीज
Tuesday, June 05 | 04:14 PM
15 0 0
Share this story



पुणे : येथील ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवनतर्फे फर्ग्युसन कॉलेज व पॅश (स्कूल्स पार्टनर्स फॉर फ्युचर प्रोजेक्टस) यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणसंबंधी (पुर्नविचार निसर्गाकडून शिका) प्रदर्शन आयोजित केले आहे.

हे प्रदर्शन पाच ते २९ जून या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत फर्ग्युसन कॉलेजमधील लोअर रिक्रिएशन हॉलमध्ये आयोजित केले. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून, याचे उद्घाटन पाच जून रोजी सकाळी ११ वाजता रोजी फग्युर्सन कॉलेजमधील अ‍ॅम्फीथिएटर येथे होणार आहे.

या प्रदर्शनाद्वारे पर्यावरणाच्या संबंधित समस्यांबाबत प्रत्येकाला विचार व जबाबदारीने कृती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये पर्यायी तंत्रज्ञान व ऊर्जा वापरून झालेले नुकसान भरून काढता येईल का, यावर देखील विचार मांडण्यात येणार आहेत.

‘ग्योथं इन्स्टिट्यूट’तर्फे या संपूर्ण प्रदर्शनाचा व्यवस्थित व नियोजित दौरा आयोजित करण्यात आला असून, त्यानंतर विद्यार्थ्यांना संवादात्मक पद्धतीने छोट्या छोट्या समस्या हाताळण्यासाठी दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर प्रदर्शनात मांडलेल्या गोष्टींच्या संदर्भात चर्चा केली जाईल व त्यावर प्रश्‍नमंजुषाचे आयोजन केले आहे.

या प्रदर्शनात निसर्ग आणि पर्यावरणासंबंधी अनेक घटक प्रदर्शित केले जातील. तरुणांनी हे पाहून व स्वत: हाताळून सध्याच्या समस्यांबाबत जाणून घ्यावे हा या प्रदर्शनामागचा उद्देश आहे. या प्रदर्शनात मुलांना मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतून मार्गदर्शन मिळेल.

प्रदर्शनाविषयी :
उद्घाटन :
पाच जून २०१८
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : अ‍ॅम्फीथिएटर, फग्युर्सन कॉलेज, पुणे
प्रदर्शन कालावधी : पाच ते २९ जून २०१८
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी पाच
स्थळ : लोअर रिक्रिएशन हॉल, फर्ग्युसन कॉलेज, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link