Next
पुण्याच्या विविध भागांत गणपतीच्या चित्रांचे प्रदर्शन
पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्हचा उपक्रम
BOI
Friday, September 06, 2019 | 03:34 PM
15 0 0
Share this article:


पुणे : सर्वांचे लाडके दैवत असणाऱ्या श्री गणेशाची विविध रूपे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्हअंतर्गत पुण्यात गणपतीच्या चित्रांचे प्रदर्शन विविध ठिकाणी भरविण्यात आले आहे.

कर्वे रस्त्यावरील हॅपी कॉलनीतील पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या कलादालनात दिनकर जाधव, संजय टिक्कल, विवेक निंबाळकर, सोमनाथ बोथे, नवनाथ क्षीरसागर यांनी काढलेली गणपतीची मूर्त आणि अमूर्त रूपांतील चित्रे पाहता येतील. मुंबईतील चित्रकार शुभांगी गाडे यांनीही गणपती, पार्वती-गणेश तसेच, अमूर्त शैलीतील गणपती साकारले असून, त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन औंधमधील वेस्टएंड मॉलमधील पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या कलादालनात सुरू आहे. 

सातारा रोडवरील वाळवेकर नगरजवळील पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या कलादालनात विश्वनाथ खिलारे यांनी साकारलेल्या गणपतींच्या चित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्हतर्फे भरविण्यात आलेल्या गणपतीच्या चित्रांचे प्रदर्शन १५ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी आठपर्यंत सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search