Next
इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला नॅशनल अॅक्रिडिटेशन
प्रेस रिलीज
Saturday, February 10, 2018 | 11:19 AM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ (पदविका) महाविद्यालयाला ‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडिटेशन’ने मूल्यांकन करून प्रमाणित केले आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ ते २०२० या तीन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र मिळाले आहे. या यशानिमित्त महाविद्यालयाने विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम, सहसचिव इरफान शेख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप कार्यक्रमाला उपस्थित होते.

या मेळाव्याचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त विद्याधर जावडेकर, विजय चंगाडिया, सचिन माहेश्वरी, डॉ. किरण भिसे यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी ‘द नेस्ट’ या माजी विद्यार्थी संघाच्या मुखपत्राचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. 

विजय चंगाडिया म्हणाले, ‘यशस्वी उद्योजक होण्यासाठी व फार्मसी व्यवसाय जतन करण्यासाठी साखळी स्टोअर्स आणि ऑनलाइन औषध विक्री थांबविण्याची गरज आहे. गेल्या वीस वर्षांत फार्मा क्षेत्रात झालेल्या बदलाला अनुसरून ज्ञान अद्ययावत करणे, रुग्णाला समुपदेशन करणे, नवीन गोष्टींचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.’ 

इरफान शेख म्हणाले, ‘आजी, माजी विद्यार्थ्यांमधील वीण घट्ट करून माजी विद्यार्थ्यांमधील अनुभवाचा आणि कौशल्याचा लाभ घ्यावा. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील फार्मासिस्ट हा महत्त्वाचा दुवा आहे.’

डॉ. व्ही. एन. जगताप म्हणाले, ‘वेगवेगळ्या क्षेत्रात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठमोठ्या पदावर आहेत, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.’

प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप यांनी स्वागत केले. सबा शेख, तस्लीम कुरेशी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search