Next
‘महिंद्रा’तर्फे नव्या तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Friday, November 16, 2018 | 12:09 PM
15 0 0
Share this article:बेंगळुरू : महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड या कंपनीच्या कर्नाटकातील पहिल्या इलेक्ट्रिक तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या नव्या केंद्रात पूर्णपणे इलेक्ट्रिक, क्लीन, कनेक्टेड आणि कन्व्हिनियंट वाहने तयार केली जाणार आहेत. या प्रसंगी ट्रेयो ही भारतात विकसित केलेली पहिली लि-आयॉन तीन चाकी ऑटो सादर करण्यात आली.

बेंगळुरू येथे असलेले हे नवे उत्पादन केंद्र प्लस एमई ब्रँडअंतर्गत भारतात इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान पद्धतीत क्रांती घडवेल. कर्नाटक सरकारनेही या केंद्राच्या विकासात अतिशय सक्रिय भूमिका निभावली आहे. या केंद्राचे उद्घाटन कर्नाटक सरकारच्या आयटी आणि बीटी, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री (मोठे व मध्यम उद्योग) केजी जॉर्ज, कौशल्य विकास, औद्योगिकता आणि अर्थार्जन आणि महसूल मंत्री आर. व्ही देशपांडे, जनहित कल्याण विभाग मंत्री प्रियांक एम. खारगे, महिंद्रा आणि महिंद्रा लिमिटेडचे  व्यवस्थापकीय संचालक आणि महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. पवन गोएंका यांच्या हस्ते करण्यात आले.

या केंद्रासाठी एकूण १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. प्लसएमई तंत्रज्ञान छत्राअंतर्गत ब्रँडेड करण्यात आलेल्या या केंद्रात बॅटरी पॅक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोटर असेंब्ली यांचे उत्पादन करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये उत्पादन प्रक्रियेचे जागतिक मापदंड वापरले जात असून, महिंद्रा इलेक्ट्रिकचे उत्पादन २५ हजार प्रती वर्षांपर्यंत वाढवले जाणार आहे. या केंद्रात २०० लोकांचा अतिरिक्त थेट रोजगार निर्माण केला जाईल; तसेच पूरक सेवांसाठी आणखी रोजगारनिर्मितीही कर्नाटक राज्यात केली जाणार आहे.

२०१७मध्ये कर्नाटक स्टेट इलेक्ट्रिसिटी व्हेइकल आणि एनर्जी स्टोअरेज धोरण जाहीर केल्यापासून उद्योग आणि दळणवळण विभागाच्या एसएलएसडब्ल्यूसीसीने मंजूर केलेला हा पहिला अशाप्रकारचा प्रकल्प आहे. कंपनीने पहिल्या लिथियम आयॉन इलेक्ट्रिक तीनचाकी ट्रेयो आणि ट्रेयो यारी श्रेणीचे उत्पादन केले आणि त्यासाठी एफएएमई सबसिडीसह १.३६ लाख रुपयांची आकर्षक किंमतही जाहीर केली आहे.

या प्रसंगी ‘महिंद्रा’चे डॉ. पवन गोएंका म्हणाले, ‘भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीचे प्रवर्तक या नात्याने महिंद्रा इलेक्ट्रिक गाड्यांमुळे येत असलेल्या क्रांतीच्या आघाडीवर असून, आपल्या क्लीन मोबिलिटी उत्पादनांद्वारे त्यासाठी प्रयत्न करत आहे. आज उद्घाटन करण्यात आलेले उत्पादन केंद्र हे ‘महिंद्रा’ने इलेक्ट्रिक तंत्रज्ञान क्षेत्रात स्थानिक मूल्यवर्धन वाढवण्यासाठी आणि भारतातील मोबिलिटीची समीकरणे बदलण्यासाठी ईव्ही तंत्रज्ञान परवडण्यासारखे करण्यासाठी टाकलेले पाऊल आहे. ट्रेयो ही भारतात विकसित करण्यात आलेली पहिली लि-आयॉन तीन चाकी ऑटो सादर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. कर्नाटक सरकारने ईव्हीसाठीच्या आपल्या प्रगतीशील धोरणासह या उपक्रमासाठी कायमच पाठिंबा दिला आहे. सरकारने राज्यात ईव्हीच्या वापरास चालना करण्यासाठी नेहमी पाठिंबा दिला आहे.’

महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, ‘महिंद्रा इलेक्ट्रिकमध्ये आम्ही आमच्या प्लस एमई तंत्रज्ञान सेवांद्वारे रस्त्यावर अधिकाधिक ईव्ही उत्पादने आणत भारताच्या प्रवास करण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडवून आणण्याचे ध्येय ठेवले आहे. ईव्हीवर ठाम विश्वास ठेवत आम्ही आता ईव्हीसाठी महत्त्वाच्या असलेल्या तंत्रज्ञानांमध्ये गुंतवणूक केली आहे आणि आमच्या बेंगळुरू येथील नव्या उत्पादन केंद्रात बॅटरी पॅक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आदी उत्पादन सुविधा स्थापन केल्या आहेत. कर्नाटक सरकारने या उपक्रमात आम्हाला मोठा पाठिंबा दिला आहे.’

‘याच प्लस एमई तंत्रज्ञानावर आधारित पहिल्या दोन ट्रेयो उपलब्ध करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. भारतातील पहिल्या लिथियम- आयॉन तीन चाकी व्यासपीठावर तयार करण्यात आलेली ट्रेयो शहरी भारताची प्रवास करण्याची पद्धत आमूलाग्र बदलेल असा आम्हाला विश्वास वाटतो,’ असे बाबू यांनी सांगितले.

सादरीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ही गाडी बेंगळुरू आणि हैद्राबादमधील निवडक वितरकांकडे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर शहरांत उपलब्ध केली जाणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search