Next
‘सिंहगड इन्स्टिट्यूट’मध्ये राज्यस्तरीय चर्चासत्र उत्साहात
प्रेस रिलीज
Saturday, January 12, 2019 | 02:24 PM
15 0 0
Share this article:



पुणे : संशोधन क्षेत्रातील अद्ययावत माहिती मिळविणे व त्याची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेसतर्फे आठ आणि नऊ जानेवारी २०१९ दरम्यान राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यात ‘शिक्षण प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञान’ या विषयावर डॉ. अन्वर शेख व अन्य मान्यवरांची व्याख्याने झाली. शिक्षकांचे शिकवण्याचे तंत्रज्ञान अद्ययावत होण्यासाठी अॅनिमेशन सॉफ्टवेअर संगणक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत राज्यातील व इतर राज्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सक्रीय सहभाग घेतला. या वेळी लोणावळा संकुलाचे संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.  

या कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक प्रा. मयुरेश राऊत यांनी केले. डॉ. राजेश ओसवाल यांनी प्रास्ताविक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search